Diabetes Diet | डायबिटीज रूग्णांची शुगर लेव्हल ताबडतोब होईल कंट्रोल, ‘या’ 5 गोष्टींचे करा भरपूर सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | जीवनशैलीत काही साधे बदल करून आपण आपले आरोग्य सांभाळू शकतो. जेव्हा मधुमेहाचा विचार केला जातो तेव्हा मधुमेहाचा आहार खूप महत्त्वाचा ठरतो. मधुमेह हा एक आजार आहे ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलमध्ये (Blood Sugar Level) चढ-उतार होतो. अशावेळी तुमचे शरीर योग्य प्रकारे इन्सुलिन तयार करू शकत नाही. येथे काही मधुमेह अनुकूल पाककृती आहेत ज्या तुम्ही घरी सहज तयार करू शकता. (Diabetes Diet)

 

1) कोरफड ज्यूस
हे ड्रिंक कोरफड वापरण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. फक्त थोडे कोरफड जेल, एक ग्लास पाणी, मीठ, भाजलेले जिरे आणि पुदिन्याची पाने मिसळा आणि एका मोठा ग्लासमध्ये सर्व्ह करा. याची चव कडू असली तरी त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

 

2) स्टीर फ्राय, उकडलेली अंडी
उकडलेले अंडे, ऑम्लेटचे सेवन करू शकता. जर तुम्हाला साधी उकडलेली अंडी आवडत नसतील, तर स्टीर फ्राय एग डीश ट्राय करू शकता. मात्र, हा पदार्थ बनवताना एक चमच्यापेक्षा जास्त तेल वापरू नका. तेल न वापरता नॉन-स्टिक पॅनमध्येही बनवू शकता. (Diabetes Diet)

3) नाचणी डोसा
या खुसखुशीत डोशामध्ये अनेक पोषक घटक असतात. नाचणी आणि गहू हाय फायबरसाठी ओळखले जातात, आणि मधुमेहींसाठी एक उत्तम न्यूट्रिशनल पॅकेज असू शकते. जर तुम्हाला नाचणी डोसाची चव आवडत नसेल, तर तुम्ही चटणीमध्ये मिसळून तो अधिक स्वादिष्ट बनवू शकता.

 

4) काळा चना चाट
चणे रात्रभर भिजत ठेवा आणि प्रेशर कुकरमध्ये उकडून घ्या. चव वाढवण्यासाठी काही उकडलेले बटाटे आणि मसाला घाला.

 

5) शिंगाडा पराठा
बकव्हीट, ज्याला शिंगाडा देखील म्हणतात, हे नवरात्रीच्या काळात उपवासाच्या पदार्थांसाठी वापरले जाणारे ग्लूटेन मुक्त धान्य आहे.
बकव्हीटमध्ये प्रोटीन, खनिजे आणि जीवनसत्त्वे जास्त असतात, ज्यामुळे ते मधुमेहींसाठी एक उत्तम पर्याय बनते.
शिंगाडा पराठा एक सोपी रेसिपी आहे जी दह्याबरोबर चांगली लागते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | diabetes patients blood sugar level will be controlled in a pinch just eat these foods daily

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Yoga Asanas For Energy And Strength | दिवसाची सुरुवात ‘या’ योगासनांच्या सरावाने करा, राहील ताकद आणि चैतन्य

 

Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

 

Health Tips | आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘हे’ आहेत उपयुक्त 5 पदार्थ; रात्री भिजत घालून खाल्ल्याने होईल फायदा, जाणून घ्या