Diabetes Diet Tips | 3 असे नट्स, ज्यांचे डायबिटीज रूग्णांनी आवश्यक केले पाहिजे सेवन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet Tips | सुक्या मेव्यामध्ये अनेक प्रकारचे न्युट्रिशन असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असतात. जर तुम्ही त्यांचे नियमित सेवन करत असाल, तर शरीराला आवश्यक असलेले अनेक पोषण पूर्ण करण्यासाठी बाहेरचे सप्लीमेंट घेण्याची गरज नाही. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात खूप काळजी घ्यावी लागते अन्यथा साखरेची पातळी वाढू शकते. आज 3 अशा ड्रायफ्रुट्सबद्दल जाणून घेवूयात जे मधुमेहाच्या रुग्णांनी अवश्य सेवन करावे. (Diabetes Diet Tips)

 

1. शेंगदाणे (Peanuts)
शेंगदाण्यामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि अल्फा लिपोइक अ‍ॅसिड मुबलक प्रमाणात असते. हे सर्व पोषण मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. आहारात फायबरयुक्त पदार्थ जरूर खावेत, कारण ते ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात (Blood Sugar Level Control) ठेवण्याबरोबरच पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे. (Diabetes Diet Tips)

 

2. बदाम (Almond)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी बदाम महत्त्वाचे आहे कारण त्यात मॅग्नेशियम आढळते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच ते इम्युनिटी वाढवण्याचेही काम करते. याशिवाय या ड्रायफ्रूटमध्ये व्हिटॅमिन-डी आणि कार्बोहायड्रेट्स फार कमी प्रमाणात असतात. याशिवाय यामध्ये आढळणारे हाय फॅट, प्रोटीन आणि फायबर हे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

3. अक्रोड (Walnuts)
तिसरे ड्राय फ्रूट अक्रोड आहे, ज्याच्या सेवनाने मधुमेहाचे रुग्ण दीर्घकाळ निरोगी राहतील. कारण अक्रोडमध्ये फायबर देखील असते जे ब्लड शुगर वाढू देत नाही. साखर नियंत्रणात ठेवण्यासोबतच पचनसंस्थेशी संबंधित समस्याही दूर ठेवते. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड्स देखील असते, जे हृदयाला निरोगी ठेवते आणि वृद्धत्वाचे परिणाम टाळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet Tips | diabetes diet tips 3 types of nuts which must be consumed by diabetes patients

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ginger Make Hair Strong | तुमच्या केसांना सुद्धा मजबूत बनवू शकते आले, जाणून घ्या कसा करायचा आहे वापर

 

Spice For Diabetes | किचनमधील ‘हा’ 1 मसाला High Blood Sugar वर रामबाण औषध, डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची पद्धत