सावधान ! ‘मधुमेह’ असल्यास चुकून देखील खाऊ नका ‘या’ 10 गोष्टी, अन्यथा कधीच कमी होणार नाही ‘ब्लड शुगर’, नेहमी आजारीच रहाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मधुमेहावर कोणताही इलाज नाही परंतु ते नियंत्रणात ठेवले जाऊ शकते. चांगला आहार आणि व्यायाम, योग, मेडिटेशन इत्यादी साखर नियंत्रणात राहण्यास फायदेशीर ठरते. जर तुम्ही हे दोन नियम लक्षात ठेवले तर तुमची शुगर लेवल कायम नियंत्रणात राहू शकेल आणि तुम्हाला कधीही इंसुलिन इंजेक्शनची आवश्यकता भासणार नाही.

गोड पदार्थ आणि सोडा – असे पदार्थ जे त्यात साखरेचे प्रमाण जास्त आहे, जसे की मिठाई. यात पोषक तत्वांची कमी असते. या पदार्थाने तुमचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढू शकते. मिठाई ऐवजी तुम्ही सफरचंद, नाशपती किंवा संत्रे खाऊ शकतात. यात ग्लूकोजचे अवशोषण कमी करण्यास मदत होते कारण यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

फळाचा रस – मधुमेह असलेल्यांनी फळाचा रस पिणे टाळले पाहिजे. त्यापेक्षा त्यांनी फळांचे सेवन केले पाहिजे कारण त्यात फायबर असते, जे आरोग्यदायी कार्बोहायड्रेट मानले जातात. फळाच्या रसात विटामिन आणि खनिज असते परंतु समस्या ही आहे की त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. याऐवजी तुम्ही लिंबू पाणी आणि कमी कॅलरी असलेले द्रवपदार्थ पिऊ शकतात, जसे की पुदिन्याचा रस.

सुकलेली फळ – सुकलेल्या फळात फायबर आणि अनेक पोषक तत्वे असतात परंतु यात पाणी कमी असते, सुकलेल्या फळ रक्तदब मधुमेह प्रमाण वाढवू शकतात. त्यापेक्षा ताजी फळे खावीत, ज्यामुळे फायबरचे प्रमाण वाढेल आणि शुगर लेवल देखील कमी राहिलं.

पांढरे तांदूळ आणि ब्रेड – पांढरे तांदूळ आणि पीठात तयार करण्यात आलेले पदार्थ जसे की ब्रेड किंवा पास्ता खाण्यापासून सावध रहा. यामुळे कार्ब्स कमी होतात. ज्यामुळे तुमची ग्लूकोज लेवल वाढेल. याऐवजी तुम्ही ब्राऊन राईस, उच्च फायबर असलेले पदार्थांचे सेवन करावे. ज्यात कार्ब्सचे प्रमाण कमी असते आणि ब्लड, ग्लुकोजवर कमी प्रभाव पडतो.

जास्त फॅट असलेले डेअरी पदार्थ – सॅच्युरेटेड पदार्थांच्या सेवनाने इंसुलिन रेसिस्टेंड कमी जास्त होऊ शकतात, त्यामुळे जास्त फॅट असलेले डेअरी पदार्थन जसे की क्रीम, दही, आईस्क्रिम, पनीर, चीज अशा पदार्थांचे सेवन टाळा. त्या ऐवजी फॅट कमी असलेल्या पदार्थांचा सेवन करा.

तळलेले पदार्थ – तळलेले पदार्थ जसे की फ्रेंच फ्राइज, फ्राइड चिकन आणि बटाट्याचे चिप्स इत्यादी खाणे टाळा. अशा पदार्थांना तेल जास्त असते. यामुळे कॅलरी वाढते आणि ब्लड, शुगरचे प्रमाण वाढते.

स्नॅक्स आणि बेकरीचे पदार्थ – पॅक पदार्थ जसे की स्नॅक्स आणि बेकरीचे पदार्थ, चिप्स, बिस्किट, डोन्ट्स आणि केक यात सोडियम आणि अपायकारक फॅट्सचे प्रमाण जास्त असते. जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल कमी करतात. यामुळे हृदय रोगांची जोखिम वाढू शकते.

मांस – टाइप – 2 मधुमेह असलेल्या लोकांनी मांस खाणे टाळावेच. यात बीफ, बोलोग्ना, हॉट डॉग, सॉसेज सारख्या पदार्थांचा समावेश आहे. यात सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि संपूर्ण शरीरावर सूज येते.