Diabetes Diet | ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेमुळे होऊ शकतो ‘टाईप- 2 डायबिटीज’चा धोका, ‘या’ फूड्सद्वारे पूर्ण करा ही कमतरता

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Diet | मधुमेह (Diabetes) हा एक असा जुनाट आजार आहे ज्यामध्ये शरीरातील रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) लक्षणीय वाढते. अन्नामध्ये असलेले कार्बोहायड्रेट (Carbohydrate) पचनाच्या वेळी ग्लुकोजमध्ये रूपांतरित होते आणि रक्तापर्यंत पोहोचते. चुकीच्या आहारामुळे इन्सुलिनचे (Insulin) उत्पादन कमी होऊ लागते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. मधुमेह ही एक मेटाबॉलिज्म (Metabolism) स्थिती आहे ज्यासाठी खराब आहार (Bad Diet) आणि खराब जीवनशैली (Bad Lifestyle) व्यतिरिक्त अनेक कारणे जबाबदार (Diabetes Diet) आहेत.

 

शरीरातील व्हिटॅमिन डीचे (Vitamin D) प्रमाण कमी होणे देखील टाइप-2 (Type-2 Diabetes) मधुमेहाच्या वाढीसाठी कारणीभूत असल्याचे मानले जाते.

 

अनेक संशोधनांमध्ये समोर आले आहे की शरीरात व्हिटॅमिन डीची (Vitamin D) कमतरता असल्यास स्वादुपिंड (Pancreas) योग्यरित्या कार्य करू शकत नाही, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन (Insulin) निर्मितीची क्रिया देखील प्रभावित होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी व्हिटॅमिन डीचे सेवन केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, शरीरासाठी आवश्यक असलेल्या या जीवनसत्त्वाची कमतरता आहारातून (Diabetes Diet) भरून काढता येते.

 

जर तुम्ही हे जीवनसत्व आहारातून पुरवू शकत नसाल तर तुम्ही त्याच्या सप्लिमेंट्सचाही (Supplements) अवलंब करू शकता. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खावेत, ते जाणून घेऊया.

 

व्हिटॅमिन डी कसे नियंत्रित करते मधुमेह (How Vitamin D Controls Diabetes) :
यूएसमधील साल्क इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या मते, व्हिटॅमिन डीचे सेवन खराब झालेल्या बीटा पेशींवर उपचार करण्यासाठी फायदेशीर ठरले. मधुमेह हा सूजमुळे होणारा आजार आहे.

 

आरोग्य तज्ज्ञांचे असे मत आहे की शरीरात पुरेसे व्हिटॅमिन डी असल्यास इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या (Insulin Resistance Problem) कमी होते आणि ब्लड शुगर लेव्हल योग्य राहते.

 

व्हिटॅमिन डी सूज कमी करते आणि मधुमेह नियंत्रित करते. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी मधुमेहाचे रुग्ण या उपायांचा अवलंब करू शकतात.

उन्हात उभे राहावे मधुमेहाच्या रुग्णांनी (Stand In The Sunlight)
मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी दिवसातून 10-15 मिनिटे कोवळ्या सूर्यप्रकाशात उभे राहावे. शरीरातील या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता पूर्ण होईल.

 

आहारात या पदार्थांचा करा समावेश (Include These Foods In The Diet) :
मधुमेही रुग्णांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात मशरूम (Mushrooms), सोयाबीन (Soybean),
बदाम (Almonds), दूध (Milk), मासे (Fish), अंडी (Eggs), संत्र्याचा ज्यूस (Orange Juice), लोणी (Butter) आणि ओटमील (Oatmeal) खावे.

 

जीवनशैलीत बदल करा (Make Changes In Lifestyle) :
शरीरातील आवश्यक जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढण्यासाठी तसेच मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करा.
रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

 

व्यायाम किंवा योगा करा (Do Exercise Or Yoga) :
मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करा. वॉकिंग (Walking) करू शकता.
20 मिनिटे योगा (Yoga) करून तुम्ही तुमचे शरीर सक्रिय ठेवू शकता.

 

ऑयली पदार्थ देखील घेऊ शकता (You Can Also Consume These Oily Foods) :
शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही आहारात काही ऑयली पदार्थही (Oily Food) घेऊ शकता.
ऑयली अन्नामध्ये तुम्ही मासे आणि दुग्धजन्य पदार्थ समाविष्ट करू शकता.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | vitamin d deficiency may increase the risk of type 2 diabetesinclude these foods in your diet to control it
Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Special Public Prosecutor Praveen Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची तेजस मोरे याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार ! गोपनीयतेचा भंग करुन स्पाय कॅमेरा लावून केले चित्रिकरण

 

Pune Crime | पुण्यातील 30 वर्षाच्या तरूणीनं मध्यरात्री दिली सिगारेटची ऑर्डर, 40 वर्षीय डिलीव्हरी बॉयनं पहाटे युवतीसमोरच केलं हस्तमैथुन

 

Governor vs Thackeray Government | राज्यपालांकडून ठाकरे सरकारला आणखी एक धक्का; विशेषाधिकार वापरत घेतला ‘हा’ निर्णय