Diabetes & Egg | डायबिटीजच्या रुग्णांनी अंडे खावे का? जाणून घ्या तत्ज्ञांचा सल्ला

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes & Egg | अंडे (Eggs) हे प्रोटीनचे पावरहाऊस (Powerhouse Of Protein) मानले जाते, यासाठी अनेक पोषण तज्ज्ञ (Nutritionist) रोज अंडे खाण्याचा सल्ला देतात. परंतु अलिकडेच एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, रोज एक किंवा त्यापेक्षा जास्त अंडे खाल्ल्याने टाइप 2 डायबिटीज (Type 2 Diabetes) चा धोका 60 टक्केपर्यंत वाढू शकतो. (Diabetes & Egg)

 

मीडिया रिपोर्टनुसार, हा रिसर्च ब्रिटिश जर्नल ऑफ न्यूट्रिशन (British Journal of Nutrition) मध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांनी चीन आरोग्य आणि पोषण सर्वेक्षणात 8,000 हून अधिक जणांचा समावेश केला होता. ज्यामध्ये अंड्याच्या सेवनाची तुलना त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीशी करण्यात आली.

 

अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की ज्या सहभागींनी जास्त अंडी खाल्ली ते शारीरिकदृष्ट्या कमी सक्रिय होते, त्यांच्यात सीरम कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त होते आणि त्यांनी जास्त चरबी आणि अ‍ॅनिमल प्रोटीन सेवन केले होते. (Diabetes & Egg)

 

महिलांना जास्त धोका
युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ आफ्रिकाच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा धोका अधिक वाढला आहे. 1991-2009 च्या अभ्यासात असे आढळून आले की अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये आढळणार्‍या कोलीनमुळे ऑक्सिडेशन आणि सूज होण्यास कारणीभूत ठरू शकते, जे अंड्यातील पिवळ्या बलकमध्ये आढळणार्‍या रसायनांमधून कार्बोहायड्रेट्सचे शोषण करण्यास अडथळा आणते.

हानिकारक ठरू शकते
तज्ञ म्हणतात की एका मोठ्या अंड्यामध्ये सुमारे 200 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते. म्हणून, अंडी खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एकतर ते उकडणे किंवा तुम्ही दोन अंड्याचे व्हेजिटेबल ऑम्लेट बनवू शकता.

 

कसे खावे अंडे?
पोषणतज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही अंड्यातील पिवळे बलक सोबत खाल्ले आणि त्यात लोणी,
पनीर आणि तेल टाकले तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी आणखी वाढते, या कारणामुळे अनेकांचे वजनही वाढते.

 

त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांचा धोकाही वाढू शकतो.
त्यामुळे अंड्याचा पांढरा भाग खावा आणि उकडल्यानंतर मीठ, मिरपूड आणि चाट मसाला घालून सेवन करू शकता.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :-  Diabetes & Egg | health tips can eating too many eggs cause diabetes

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Facing Acne Problem | मुरुमांच्या समस्येला सहजतेने घेऊ नका, आरोग्याच्या ‘या’ 5 गडबडीचा आहे संकेत

Diabetes – High Blood Sugar Level | डायबिटीजच्या रूग्णांमध्ये पपई खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Winter Diet Chart | हिवाळ्यात कसा असावा डाएट चार्ट, जाणून घ्या सविस्तर