Diabetes Food | मधुमेहींसाठी काळ्या हरभऱ्याचे पाणी वरदान, जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Diabetes Food | काळ्या हरभऱ्याचे (Kala Garam) पाणी मधुमेहाच्या पेशंटसाठी (Diabetes Patient) वरदान समजलं जातं. काळ्या हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. काळे हरभरे (Diabetes Food) शरीरातील अतिरिक्त ग्लुकोजचे प्रमाण कमी करून शुगर लेव्हल नियंत्रणात (Sugar Level Control) ठेवण्यास मदत होते. काळ्या हरभऱ्याचे (Diabetes Food) पाणी पिण्यानं आरोग्याला अनेक फायदे नाही. जाणून घ्या ते बनवण्याची आणि पिण्याची योग्य पद्धत :

 

जाणून घ्या काळ्या हरभऱ्याच्या पाण्याचं कधी आणि कसं सेवनं करावं –
मधुमेहाच्या पेशंटनं दररोज दोन मूठ हरभरे धुवून भिजत ठेवावे. हे हरभऱ्याचं पाणी सकाळी अनोशापाटी प्यावे. हे पाणी प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच काळ्या हरभऱ्यामुळं आरोग्यास खालील लाभ होतात.

 

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी –
आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रतिकारशक्ती चांगली असणं अत्यंत गरजेच आहे. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हरभऱ्याचं पाणी अत्यंत फायदेशीर आहे. काळ्या हरभऱ्यामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात. तसेच काळ्या हरभऱ्यामध्ये क्लोरोफिल आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर आहे. मधुमेह व्यतरिक्त अन्य लोकांनीही याचे दररोज सेवन केल्यानं त्यांच आरोग्य निरोगी राहण्यास फायदा होऊ शकतो. (Diabetes Food)

पोटाची चरबी कमी करण्यासाठी –
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी माहितीनुसार, रात्री भिजवलेले हरभरे उकळल्यानंतर सकाळी त्याचे
पाणी गाळून त्यात काळे मीठ, पुदिना, जिरा पावडर टाकून प्यायल्याने पोटावरील चरबी जळण्यास मदत होते.

 

पोटाच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी –
पोटाच्या समस्या अनेक आजारांच मुळ असतं. अशा परिस्थितीत पोटदुखी आणि बध्दकोष्ठता यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी
भिजवलेल्या काळ्या हरभऱ्याचे सेवन खूप लाभदायक आहे. यासाठी भिजवलेल्या हरभऱ्याच्या पाण्यात जिरे आणि काळे मीठ मिसळून प्यावे.

 

Web Title :- Diabetes Food | diabetes food know how to make black gram or kala chana water to control blood sugar slide

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nia Sharma Bold Photo | शॉर्ट ड्रेसमधील बोल्ड फोटोमुळं निया शर्मानं लावली सोशल मीडियावर आग, फोटो पाहून चाहते म्हणाले…

 

ACP Narayan Shirgaonkar | सहाय्यक आयुक्त नारायण शिरगावकर यांची पुण्याच्या गुन्हे शाखेत नियुक्ती; ACP लक्ष्मण बोराटे सेवानिवृत्त

 

Pune Crime | व्याजाच्या पैशासाठी व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी, खासगी सावकाराला गुन्हे शाखेकडून अटक

 

PMC Pune Elections | निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही ‘प्रारूप प्रभाग रचनेत’ ऐनवेळी मोठे फेरबदल !