Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’ भाज्या कधीही खाऊ नयेत, शुगर अचानक होते हाय; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Foods | भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु सर्व भाज्या प्रत्येक परिस्थितीत समान प्रभाव देत नाहीत. उदाहरणार्थ, मधुमेही रुग्णांना (Diabetic Patients) काही भाज्या खाण्यात त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) अचानक वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना मधुमेहाच्या गंभीर लक्षणांनाही सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया मधुमेहामध्ये कोणत्या भाज्या खाऊ नयेत (Diabetes Foods).

 

Foods To Avoid In Diabetes :
मधुमेहाच्या रुग्णांनी टाळाव्या या भाज्या मधुमेहामध्ये तुम्ही कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खा. उच्च-ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या अन्नामुळे ब्लड शुगरमध्ये अचानक आणि जलद वाढ होते. मात्र, या भाज्यांचे सेवन बिलकूल बंद करावे, असे नाही. परंतु त्या खाण्यापूर्वी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा (Diabetes Foods).

 

1. मटार (Peas)
हिरव्या मटारमध्ये प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. ज्याचा शरीराला फायदा होऊ शकतो. पण त्यात कार्बोहायड्रेटही भरपूर असते. ज्यामुळे ब्लड शुगर झपाट्याने वाढू शकते. 1 कप मटारमध्ये सुमारे 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट असू शकतात.

 

2. बटाटे (Potato)
बटाट्याचे सेवन केल्याने शरीराला भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबर मिळतात. पण बटाट्याच्या अतिसेवनामुळे मधुमेहाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. कारण, या अन्नामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण चांगले असते. 100 ग्रॅम बटाट्यांमधून तुम्हाला सुमारे 17 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळू शकतात.

3. रताळे (Sweet Potato)
रताळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि मिनरल्स (Antioxidants, Vitamins And Minerals) मुबलक प्रमाणात असतात. पण बटाट्याप्रमाणेच त्याचे अतिसेवन केल्यास मधुमेहाचा आजार गंभीर होऊ शकतो. कारण, 100 ग्रॅम रताळ्याचे सेवन केल्याने तुम्हाला सुमारे 20 ग्रॅम कार्ब्ज मिळतात. जे रक्तात वेगाने विरघळते आणि साखरेचे प्रमाण वाढवते.

 

4. मका (Corn)
मका हे पिष्टमय अन्न आहे, जे शरीराला प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे देते. पण जर कार्ब्ज बद्दल बोलायचे झाले
तर 100 ग्रॅम मका खाल्ल्याने सुमारे 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट मिळते. जे मधुमेही रुग्णांसाठी घातक ठरू शकते.
त्यामुळे मधुमेहाचा आजार आटोक्यात ठेवण्यासाठी पोषणतज्ञांचा सल्लस जरूर घ्या.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Foods | worst vegetables to avoid in diabetes problem which can causes high sugar tips reduce blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Pune Crime | कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेला 2 लाखांचा गंडा; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर