Diabetes मुळे शरीराच्या ‘या’ भागात होतात तीव्र वेदना, जाणून घ्या कसा दूर होईल त्रास

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेह हा एक असा आजार आहे (Diabetes) जो इतर अनेक समस्यांचे मूळ आहे असे मानले जाते. त्यामुळे ह्रदयविकार, किडनीचे आजार (Heart disease, kidney disease) व सर्व प्रकारच्या समस्या उद्भवतात, त्यापैकी एक म्हणजे पाय दुखणे, त्यामुळे रुग्णांना चालणे कठीण होते. ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) वाढल्यानंतर पाय दुखणे सामान्य गोष्ट आहे, परंतु काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास या समस्येवर मात करता येते. हे उपाय जाणून घेवूयात (Foot Pain in Diabetes)…

 

मधुमेही रुग्णांनी असे दूर करावे पायाचे दुखणे

1. ब्लड शुगर कंट्रोल करा (How To Control Blood Sugar Level)
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ब्लड शुगर कंट्रोल ठेवणे ही निरोगी राहण्याची पहिली अट आहे, याशिवाय कोणत्याही प्रकारची समस्या दूर होण्याची कल्पनाही करता येत नाही. यासाठी तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीत (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयींमध्ये बदल करायला हवे. तुमच्या जेवणाची, व्यायामाची आणि झोपेची वेळ निश्चित करा आणि त्यात जास्त बदल करू नका. जास्त गोड आणि तेलकट पदार्थांपासून (Oily foods) दूर राहा, कारण यामुळे रोगांचा धोका लक्षणीय वाढतो. (Diabetes)

 

2. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटीज वाढवा
व्यायाम (Exercise) हा अनेक समस्यांवर उपाय आहे, हे मधुमेही रुग्णांनाही लागू आहे. जर तुम्ही रोजचे वर्कआऊट (work out) केले तर पायांचे दुखणे सहन करणे थोडे सोपे होईल, तसेच हळूहळू वेदना देखील कमी होऊ लागतील. त्यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते आणि शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते. दिवसभराच्या कामातून थोडा वे जिमसाठीही काढा, जर हे शक्य नसेल तर आजूबाजूच्या मैदानात किंवा उद्यानात फिरा किंवा जॉग करा. यामुळे तुम्हाला बरे वाटेल आणि त्याचबरोबर फिटनेसही अबाधित राहील.

3. गरम पाण्याचा वापर करा
कोमट पाण्याच्या मदतीने पाय दुखणे दूर केले जाऊ शकते, पाय धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा किंवा आंघोळीसाठी देखील असे पाणी वापरणे खूप फायदेशीर ठरू शकते.

 

4. पायांची घ्या विशेष काळजी
जेव्हा पायात तीव्र वेदना होतात तेव्हा तुम्ही कोणत्या चूका करत आहात ते शोधा. तुम्ही तुमचे पाय स्वच्छ करा आणि तुमची नखे नियमितपणे कापा. रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर सूज वाढली आहे का ते पहा. मधुमेहाच्या रूग्णांसाठी न्यूरोपॅथिक उपचार खूप प्रभावी आहे, ज्यामध्ये विशेष पादत्राणांच्या मदतीने वेदना कमी केली जाते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Diabetes | foot pain in type 2 diabetes blood sugar level control tips physical activities hot water cleanliness

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Turmeric Water | मान्सूनमध्ये हळदीच्या पाण्याने करा आपल्या दिवसाची सुरुवात, इम्युनिटी राहिल स्ट्राँग; वारंवार पडणार नाही आजारी

 

Kidney Stone | ‘या’ 8 गोष्टींचा करा डाएटमध्ये समावेश, तुटून बाहेर पडेल मुतखडा

 

Maharashtra Politics | पुण्यातील काँग्रेसचा ‘हा’ नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?