Diabetes | मधुमेहींनी ‘या’ गोष्टींचं सेवन चुकून देखील करू नये, रक्तातील साखरेचं प्रमाण वाढू शकतं; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | भारतातच नव्हे, तर जगभरात मधुमेहाच्या रुग्णांची (Diabetes Patients) संख्या झपाट्याने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या World Health Organization (WHO) अहवालानुसार १९८० साली जगभरात मधुमेहींची (Diabetes Symptoms) संख्या सुमारे १० कोटी ८० लाख रुपये होती, मात्र २०१४ साली रुग्णांची संख्या वाढून ४२ कोटींहून अधिक झाली. २० ते २०१६ या काळात मधुमेहामुळे (Diabetes) अकाली मृत्यूचे प्रमाण पाच टक्क्यांनी वाढले आहे.

 

मधुमेहाच्या रुग्णाने आपल्या आहाराची विशेष काळजी (Special Dietary Care) घेतली पाहिजे. काही गोष्टींच्या सेवनाने मधुमेहाच्या रुग्णाची शुगर लेव्हल (Sugar Level) वाढते, जी त्यांच्यासाठी घातक ठरू शकते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातही मधुमेहाचा रुग्ण असेल तर साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणार्‍या गोष्टींचं सेवन करा. आरोग्य तज्ज्ञाच्या मते, याचे सेवन करून साखरेची पातळी वाढवणार्‍या गोष्टींबद्दल जाणून घ्या.

 

मधुमेहींनी काय खाऊ नये (What Diabetic Patients Should Not Eat) ? –
बटाटे आणि रताळे (Potato And Sweet Potato) खाऊ नका. ते खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते, जे मधुमेहाच्या रुग्णासाठी घातक ठरू शकते. मधुमेहींनी गोड पदार्थ कमी खावेत. त्याचबरोबर आइस्क्रीम, केक, चॉकलेट अशा गोष्टींचं सेवन टाळायला हवं. पेस्ट्रीज, केक, क्रीम बिस्किटे इत्यादी खाल्ल्याने रक्तातील साखरेत झपाट्याने वाढ होते. मधुमेहींसाठी हे हानिकारक ठरू शकते (Diabetes).

 

तळलेले पदार्थ (Fried Food) –
मसालेदार, तळलेले भाजलेले (Spicy, Fried, Baked Food) खाण्याची आवड असणार्‍या मधुमेहींनी विशेषतःनमकीन, पकोडे, कचोरी असे पदार्थ अजिबात खाऊ नये. तळलेले, भाजलेले किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) वाढते.

फळांचा रस (Fruit Juice) –
फळे ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार प्रमाणात खाल्ली तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी फळांचा रस पिऊ नये. केळी, चिकू, सीताफळ या फळांचा रस किंवा मिल्कशेक याचे सेवन अजिबात करू नका.
फळांचा रस मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | health tips for today diabetes patient should avoid these food

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात कधी ऊन तर, कधी पाऊस ! आता गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता

 

Sanjay Raut | ‘शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींसमोर सक्षम पर्याय निर्माण होऊ शकत नाही’ – संजय राऊत

 

Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल, डिझेलची घोडदौड सुरुच ! आठवड्याची सुरुवातही भाववाढीने, जाणून घ्या नवीन दर