Diabetes-High Blood Sugar Level | हाय ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यात उपयोगी आहेत ‘या’ भाज्या, मधुमेहाच्या रूग्णांनी असा करावा आहारात समावेश; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diabetes-High Blood Sugar Level | मधुमेह (Diabetes) हा एक चयापचय विकार (metabolic disorder) आहे, ज्यास स्लो पॉयझन सुद्धा म्हणतात. मधुमेहाच्या आजारात स्वादुपिंड (pancreas) इन्सुलिन (insulin) हार्मोनचे उत्पादन कमी करते किंवा थांबवते. इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करते. जेव्हा शरीर या हार्मोनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा ब्लड शुगर लेव्हल (blood sugar level) वाढते. (Diabetes-High Blood Sugar Level)

 

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेही रुग्णांनी ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढल्याने हृदयविकाराचा झटका, किडनी निकामी होणे आणि अनेक अवयव निकामी होणे यांसारख्या जीवघेण्या परिस्थितीचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी आहाराची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

 

मधुमेहाच्या रुग्णांना कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्याचा ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो. काही भाज्या अशा आहेत, ज्यांचे सेवन मधुमेही रुग्ण करू शकतात. (Diabetes-High Blood Sugar Level)

 

1. फ्रोजन मटर (Frozen Peas) :
मधुमेहाचे रुग्ण फ्रोजन मटर खाऊ शकतात. कारण त्यात पोटॅशियम, लोह आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते. फ्रोजन मटरच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

2. रताळे (Sweet Potato) :
हिवाळ्यात मिळणारे रताळे खायला खूप चविष्ट असते. त्यात लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, प्रोटीन आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते, त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात रताळ्याचा समावेश करू शकतात.

 

3. ब्रोकोली (Broccoli) :
ब्रोकोलीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यामध्ये फायबरसोबतच व्हिटॅमिन ए, सी आणि के चे प्रमाणही आढळते,
ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.

 

4. गाजर (Carrots) :
गाजराच्या भाजीबरोबरच त्याचा हलवाही लोक आवडीने खातात.
कच्च्या गाजराचा जीआय फक्त 14 असतो. तसेच त्यात स्टार्चचे प्रमाण खूप कमी असते.
त्यामुळे मधुमेही रुग्ण त्यांच्या आहारात गाजराचा समावेश करू शकतात.

 

याशिवाय मधुमेही रुग्ण फरसबी (green beans), वांगी (eggplants), मिरी (peppers),
पालक (spinach), टोमॅटो (tomatoes), शतावरी (asparagus), फ्लॉवर (cauliflower) आणि लेट्यूसचे सेवन करू शकतात.

 

 

Web Title :- Diabetes-High Blood Sugar Level | diabetes patients can add these vegetables in diet to control high blood sugar level blood sugar normal range

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Multibagger Stock | काही महिन्यात 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख, गुंतवणुकदार झाले मालामाल

Deccan Queen Express | पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास होणार वेगवान ! ‘डेक्कन क्वीन’ लवकरच नव्या रंगात

Kiara Advani-Sidharth Malhotra | कियारा आणि सिद्धार्थ 2022 मध्ये त्यांचे नाते करणार ऑफिशअल?