डायबिटीजचे घरगुती उपाय, वापरा ‘या’ 5 आयुर्वेदिक जडी बूटी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – दिल्लीचे प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर जेसी मोहन यांच्यानुसार, भारतात सुमारे 7.5 कोटी लोक डायबिटीजने पीडित आहेत. शरीरात शुगर लेव्हल वाढल्याने आणि शरीरात इन्सुलिन कमी निर्मिती होत असल्याने हा आजार होतो. आता केवळ ज्येष्ठ नव्हे, तर तरूण, मुले आणि गरोदर महिलांना सुद्धा डायबिटीज होऊ लागला आहे.

1 कारले
ब्लड शुगरचा स्तर कमी करण्यासाठी कारल्यात दोन आवश्यक घटक असतात त्यास चारॅटिन आणि मोमोर्डीसिन म्हणतात, हा एक चांगला पयार्य आहे. यासाठी 100 ग्रॅम कारल्यांचा ज्यूस बनवून सकाळी रिकाम्यापोटी प्यायल्यास डायबिटीजच्या रूग्णांना खुप लाभ मिळतो.

2 मेथी
एक चमचा मेथी रात्री पाण्यात टाकून भिजवत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या आणि मेथी चावून खा. यामुळे डायबिटीज नियंत्रित राहतो. ब्लड शुगर कमी होते. इंसुलिन तयार होते.

3 आंब्याची पाने
निरूपयोगी समजली जाणारी आंब्याची पाने डायबिटीजच्या रूग्णांसाठी खुप लाभदायक आहेत. रोज आंब्याची ताजी पाने एक ग्लास पाण्यात उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवून द्या. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी प्या खुप आराम मिळतो.

4 आवळा
आवळा व्हिटॅमिन सी चा चांगला स्त्रोत आहे. याच्या सेवनाने ब्लड शुगरचा स्तर संतुलित राहातो.

5 शेवगा
मोरिंगा म्हणजेच शेवगा ब्लड शुगरचा स्तर नियंत्रित ठेवतो आणि शरीराची उर्जा वाढवतो. डायबिटीजच्या रूग्णांनी शेवग्याच्या पाने सेवन करणे लाभदायक आहे.