शरीराला कसा प्रभावित करतो Diabetes, किडनी, हृदय आणि मेंदूवर करतो असा परिणाम…

पोलीसनामा ऑनलाइन टीम – असे मानले जाते की मधुमेहाच्या (Diabetes) समस्येचा सर्वात जास्त परिणाम किडनीवर (Kidney) होतो. पण सत्य हे आहे की हा आजार फक्त किडनीवरच परिणाम करत नाही तर हृदय (Heart) आणि मेंदूसाठीही (Brain) खूप हानिकारक आहे. एखाद्या रोगामुळे, इतर काही आरोग्य समस्या (Health Problems) देखील रुग्णाला त्रास देऊ लागतात, अशा रोगांना शॅडो डिसीज (Shadow Disease) म्हणतात. मधुमेह (Diabetes) हा देखील असाच एक आजार आहे ज्यामुळे इतर अनेक आरोग्यविषयक समस्या उद्भवतात. मधुमेहाचा शरीरावर कसा परिणाम होतो ते जाणून घेवूयात. (Effects of Diabetes on Your Body)

 

1. हृदयाला मधुमेहाचा धोका (Diabetes Can Affect Your Heart)
मधुमेहाच्या (Diabetes) सुमारे 70 टक्के प्रकरणांमध्ये लोक लठ्ठपणा, रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलसारख्या (Obesity, High Blood Pressure, High Cholesterol) समस्यांनी ग्रस्त आहेत. अशा रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते, त्यामुळे त्या हळूहळू अरुंद होतात आणि त्यामुळे रक्ताभिसरणात (Blood Circulation) अडथळा निर्माण होतो.

 

त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजनयुक्त शुद्ध रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत घ्यावी लागते, अशा प्रकारे शरीरातील हा सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजेच हृदय कमकुवत (Heart Weak) होऊ लागते. या कारणांमुळे हार्ट फेल्युअर (Heart Failure), आर्टरी ब्लॉकेज ( Artery Blockage) आणि हार्ट अटॅक (Heart Attack) यासारख्या समस्या उद्भवतात.

 

2. मेंदूला हानिकारक (Harmful For Brain health)
मधुमेहामुळे ज्याप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल (Cholesterol) किंवा इतर हानिकारक पदार्थ (Harmful Substance) जमा होऊ लागतात, त्याचप्रमाणे मधुमेहामुळे मेंदूच्या नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक (Brain Stroke) देखील होऊ शकतो. त्याच वेळी, यामुळे स्मरणशक्ती (Memory) कमी होण्याचा धोका देखील असतो.

 

शुगरचे रुग्ण आहारावर नियंत्रण ठेवतात आणि शुगर लेव्हल (Sugar Level) कमी ठेवण्यासाठी औषधाचीही मदत घेत
असल्याने काही वेळा त्यांची शुगर लेव्हल अचानक खूप कमी होते, त्यामुळे रुग्ण बेशुद्धही होतो, काही वेळा रुग्ण कोमातही जाऊ शकतो.

3. किडनीवर परिणाम (Effects On Kidneys)
किडनी आपल्या शरीरात फिल्टरसारखे काम करते, रक्त फिल्टर करून स्वच्छ करते.
मधुमेहामध्ये, रक्तातील साखरेचे प्रमाण (Blood Sugar Level) वाढल्याने किडनीच्या बारीक रक्तवाहिन्या नलिकेला हळूहळू खराब करतात,
त्यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते.
किडनीचे बहुतांश रुग्ण हे मधुमेहाचे रुग्ण (Diabetes Patients) असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | how does diabetes affect the body system the effects of diabetes on your body diabetes the invisible damage it does to your body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांनी झोपण्यापूर्वी करावी ‘ही’ 5 कामे, शुगर राहील कंट्रोल

 

PMC Property Tax | पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या कारवाई नंतर दिवसात 1 कोटी 86 लाख वसुल

 

Pune Crime | येरवडा परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांचा छापा; 8 जणांवर कारवाई