Diabetes In Children : कोविडमुळे होत आहे डायबिटीज, मुलांमध्ये सुद्धा हा धोका आला समोर

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोना व्हायरस केवळ डायबिटीजने ( Diabetes ) ग्रस्त लोकांसाठी घातक नसून अनेक लोकांना डायबिटीजची समस्या सुद्धा देत आहे. अमेरिकेच्या वेटरन्स अफेयर्स सेंट लुईस हेल्थ केयर सिस्टममध्ये क्लिनिकल एपिडोमोलोजी सेंटरचे संचालक जियाद अल-एली यांनी सांगितले की, सुरुवातीला हे विश्वास ठेवणे कठिण होते की, कोविडमुळे असे होऊ शकते.

काही डॉक्टरांना शंका आहे की, सार्स-कोव्ह-2 व्हायरस पॅन्क्रियासह इन्सुलिन बनवणार्‍या ग्रथींना सुद्धा नुकसान पोहचवू शकतो. कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे लोकांच्या जीवनशैलीत बदल झाले आहेत. शास्त्रज्ञांनुसार, काही मुलांमध्ये सुद्धा कोरोना व्हायरसची हलकी लक्षण आढळली तरी सुद्धा त्यांच्यात डायबिटीजची Diabetes सुरूवात वेगाने होऊ शकते.

मेटाबॉलिक संबंधी समस्यांमध्ये कधी-कधी इन्सुलिनच्या उच्च डोसची आवश्यकता असते. यामुळे व्यक्तीमध्ये डायबिटीजचा Diabetes धोका विकसित होऊ शकतो. संशोधनानुसार, जे लोक अगोदर डायबिटीजशी सामना करत होते, त्यांच्यापैकी अनेक लोकांमध्ये सूज दिसून आली.

अल-एली आणि त्यांच्या टीमला अमेरिकेच्या वेटरन्स अफेयर्स विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य देखभाल डेटाबेसच्या निष्कर्षावर पहिल्यांदा जाणवले की, कोविड संसर्गातून बचावलेल्या लोकांच्या तुलनेत कोविडमधून बरे झालेल्या लोकांमध्ये सहा महिन्यांच्या आत डायबिटीज होण्याची शक्यता जवळपास 39% जास्त होती. प्रत्येक 1,000 कोविड रूग्णांवर 6 लोकांमध्ये डायबिटीज होण्याचा धोका आहे.

अल-एली यांचा डेटा मागील महिन्यात नेचरमध्ये प्रकाशित झाला होता. यामध्ये त्यांनी इंग्लंडच्या एका हॉस्पिटलमध्ये कोविडने संक्रमित 50,000 रूग्णांवर तीन आठवडे अभ्यास केला. यामध्ये डिस्चार्जच्या जवळपास 20 आठवड्यानंतर त्या रूग्णांमध्ये डायबिटीज Diabetes होण्याची शक्यता 50% जास्त आढळली.

किंग्ज कॉलेज लंडनमध्ये मेटाबॉलिक आणि बेरिएट्रिक सर्जरीचे प्रमुख फ्रांसेस्को रुबिनो यांनी म्हटले, आम्हाला दोन महामारीशी संघर्षाचा धोका दिसत आहे. संशोधकांनी असे फॅक्टर्स शोधले आहेत जे कोविड डायबिटीजचा धोका वाढवू शकतात.

हाँगकाँग विद्यापीठात पॅथोलॉजीचे क्लिनिकल प्रोफेसर जॉन निकोल्स यांच्यानुसार, कोविड रूग्णांमध्ये डायबिटीज होण्याची अनेक कारणे आहेत – संसर्गाच्या प्रति एक्यूट स्ट्रेस रिस्पॉन्स, स्टेरॉईडचा जास्त वापर जो ब्लडमध्ये शुगरची लेव्हल वाढवतो, किंवा केवळ डायबिटीजची ती प्रकरणे ज्यांचे अगोदर निदान झाले नव्हते.

जगभरातील सुमारे 500 डॉक्टर रुबिनोच्या डायबिटीज रजिस्ट्रीच्या माध्यमातून डेटा सामायिक करण्यासाठी सहमत झाले आहेत. आतापर्यंत रजिस्ट्रीच्या माध्यमातून जवळपास 350 प्रकरणे नोंदली गेली आहेत. याशिवाय, याच्याशी संबंधीत रूग्ण आणि आई-वडीलांच्या ईमेलच्या माध्यमातून जवळपास रोज याची माहिती मिळत आहे. या माहितीनुसार, सुमारे 8 वर्षाच्या मुलाला ज्यास 2 महिन्यापूर्वी कोविड झाला होता, त्याच्यात सुद्धा डायबिटीज आढळला.

हे सांगणे अवघड आहे की, सार्स-कोव्ह-2 ने डायबिटीज होऊ शकतो. मेलबर्नच्या बेकर हार्ट अँड डायबिटीज इन्स्टीट्यूटचे उपसंचालक जोनाथन शॉ यांनी म्हटले, लोकसंख्या-आधारित डेटावर डायबिटीजचा शोध घेण्यासाठी कोविड महामारीचा प्रभाव ओळखला जाऊ शकतो. दरम्यान, लॉस एन्जलिसच्या डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, मुलांमध्ये टाईप -2 डायबिटीजची नवीन प्रकरणे दिसून आली. डायबिटीजचा Diabetes धोका वजन वाढणार्‍या मुलांमध्ये किंवा फिजिकल अ‍ॅक्टीव्हिटीज कमी करणार्‍या मुलांमध्ये जास्त दिसून आला आहे.

Also Read This : 

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या

Maharashtra : राजघराण्यातील सदस्याला पैशांसाठी केलं ब्लॅकमेल, एक लाखाची खंडणी घेताना काँग्रेसचा नेता अटकेत

दररोज दह्यासोबत गुळाचं सेवन या वेळी करा, Immunity वाढण्यासह होतील ‘हे’ जबरदस्त फायदे, जाणून घ्या

‘पिंपरी- चिंचवडमध्ये अजित पवारांनी विकासकामे करुनही नशिबी पराभवच आला’ – राज ठाकरे

फुफ्फुसांना ‘निरोगी’ ठेवायचंय तर ‘ही’ 5 योगासने करा, कोरोनापासून होईल बचाव, जाणून घ्या

DIG मनु महाराज यांचे ‘फेक’ फेसबूक प्रोफाइल बनवून मुलींशी अश्लील चॅटिंग, झाली अटक