डायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण

जर तुम्ही डायबिटीजचे पेशंट आहात आणि तुमची ब्लड शुगर लेव्हल वाढलेली असेल तर तुम्ही ही एक वस्तू खाऊन शुगर लेव्हल नियंत्रणात आणू शकता. ही एक वस्तू आहे जांभळाच्या बी ची पावडर. कशा प्रकारे शुगरच्या रूग्णांना याचा लाभ होऊ शकतो आणि कशा प्रकारे ब्लड शुगर नियंत्रणात करता येते ते जाणून घेवूयात…

जांभूळ करेल ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित
चवीला जांभूळ तुरट असते. जांभळात फायबर, मॅग्नेशियम, आयर्न आणि विटॅमिन ए, बी आणि सी आढळते. पण मधुमेह रूग्णांसाठी केवळ जांभूळच नव्हे, तर त्याचे बी सुद्धा लाभदायक आहे. याचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल लवकर नियंत्रित होते. आरोग्य तज्ज्ञांनुसार, जांभूळाचे बी वापरल्याने ब्लड स्ट्रीममध्ये शुगर ज्या गतीने रिलिज होते तिला कमी केले जाऊ शकते. सोबतच शरीरात इन्सुलिनचे प्रोडक्शन वाढवते.

असा करा जांभळाच्या बी चा वापर
* जांभुळाच्या बी ची पावडर बनवून तिचा वापर करा.
* सर्वप्रथम जांभळाच्या बीया सुकवा.
* बीया सुकल्यानंतर त्या वाटून पावडर तयार करा.
* रोज सकाळी रिकाम्यापोटी दूधासह याचे सेवन करा.
* याच्या सेवनाने डायबिटीज पेशेंटची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित होते.