Diabetes Joint Pain | ब्लड शुगर वाढल्याने का होते सांधेदुखी? ‘या’ पद्धतींनी होऊ शकते सुटका; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Joint Pain | बदलती जीवनशैली आणि कामात व्यस्त असलेल्या लोकांना अनेक किरकोळ समस्या येतात. परंतु काही आरोग्य समस्या भविष्यातील रोगांचे लक्षण आहेत. जर तुम्हाला सांधे किंवा खांदेदुखीची समस्या (Joint Pain Problem) भेडसावत असेल किंवा तुम्हाला कोणत्याही कारणाशिवाय सांधेदुखीचा (Diabetes Joint Pain) त्रास होत असेल तर सावध व्हा, हे मधुमेहासारख्या गंभीर आजाराचे लक्षण असू शकते (Diabetes Unknown Symptoms).

 

मधुमेहाच्या रुग्णांसाठी, ब्लड शुगर (Blood Sugar) वाढण्याबरोबरच, रुग्णांमध्ये सर्वात गंभीर समस्या म्हणजे हात आणि पाय दुखणे. शुगरचे रुग्ण अनेकदा ही तक्रार करतात. मधुमेहाच्या आजारात शरीर हळूहळू पोकळ होत असल्याने असे घडते.

 

ब्लड शुगरचे प्रमाण वाढल्यामुळे इतर अनेक अवयवांवरही त्याचा परिणाम होतो. मधुमेहींचे स्नायू, हाडे आणि लिगामेंट्स कमकुवत होते. या कारणास्तव, त्यांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो (Diabetes Joint Pain). तसेच सांधे सुजणे आणि हालचाल करण्यात अडचण येणे हे देखील या आजाराचे लक्षण असू शकते. यापासून मुक्ती कशी मिळवायची ते जाणून घेवूया (How To Get Rid Of Diabetes Joint Pain)…

 

तुम्ही मधुमेहाचे रुग्ण ( Diabetes Patients) असाल आणि धुम्रपान करत असाल तर तात्काळ ही सवय सोडून द्या. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे ऊतींवर (Tissues) परिणाम होतो, ज्यामुळे जास्त वेदना होतात. त्यामुळे कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन करावे.

मधुमेहींसाठी एरोबिक व्यायाम खूप फायदेशीर (Aerobic Exercise Beneficial For Diabetes) आहे. जसे की चालणे किंवा पोहण्याने सहसा हिप आणि गुडघ्याचे कार्य सुधारते. त्यामुळे सांधेदुखीने त्रस्त असलेल्या बहुतांश लोकांसाठी पाण्याचे व्यायाम देखील खूप प्रभावी आहेत. याशिवाय तुम्ही सायकल देखील चालवू शकता.

 

दुसरीकडे, जर तुम्हाला तुमच्या सांध्यामध्ये तीव्र वेदना होत
असतील, तर तुम्ही त्यापासून आराम मिळवण्यासाठी हॉट अँड कोल्ड थेरपी (Hot And Cold Therapy) वापरू शकता.
यामुळे बराच आराम मिळतो. या थेरपीमध्ये तुम्हाला दुखणार्‍या सांध्यांवर 10-15 मिनिटे बर्फ ठेवावा लागतो.
असे केल्याने सूज कमी होऊ शकते. याशिवाय, तुम्ही हीट पॅड देखील वापरू शकता.

 

स्ट्रेचिंग सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे केवळ हात-पायांच्या दुखण्यापासून आराम मिळत नाही तर स्नायूंना टोनिंग होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांनी अनेक प्रकारचे स्ट्रेचिंग व्यायाम (Stretching Exercises) करावेत,
यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. फिटनेस तज्ञांच्या मते, दररोज सकाळी स्ट्रेचिंग केल्याने शरीराला अधिक फायदा होतो.
पण ते करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या तज्ञांचा सल्ला घ्यावा की ते कसे, किती दिवस आणि केव्हा करावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Joint Pain | diabetes joint pain due to increase in blood sugar joint pain occurs can be relieved by these methods

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

 

Digital Rape in Noida | अल्पवयीनावरील ’डिजिटल रेप’मध्ये 81 वर्षांच्या चित्रकाराला अटक, जाणून घ्या काय आहे डिजिटल रेप

 

Amruta Fadnavis on CM Uddhav Thackeray | अमृता फडणवीसांचा CM उद्धव ठाकरेंना टोला; म्हणाल्या – ‘वजनदार ने हल्के को…’