ब्लड शुगर कमी असो की जास्त, हृदय आणि किडनीसाठी धोकादायक; जाणून घ्या ‘ही’ 11 लक्षणे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  शरीर व्यवस्थित चालण्यासाठी ब्लड शुगर( Blood sugar) नियंत्रित असणे खुप आवश्यक आहे. ब्लड शुगर( Blood sugar) लेव्हल जास्त होण्याला डायबिटीज म्हटले जाते. ब्लड शुगर लेव्हल बिघडल्याने अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. ब्लड शुगर जास्त किंवा कमी झाल्याने शरीरात कोणती लक्षणे दिसतात ते जाणून घेवूयात…

Corona Vaccination : उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस मिळणार – आदित्य ठाकरे

1 वारंवार लघवीला जाणे

ब्लड शुगर ज्यास्त झाल्याने वारंवार बाथरूमला जावे लागते. किडनीवर जास्त दाब येतो. यामुळे पाण्याची मात्रा सुद्धा कमी होते.

2 खुप तहान लागते

ब्लड शुगर जास्त झाल्याने शरीर आपल्या ऊतींमधून पाणी खेचते. यामुळे शरीराला पाण्याची आवश्यकता असल्याने मेंदूला वारंवार तहान लागल्याचा संकेत जातो.

3 तोंड सुकू लागते

ब्लड शुगर जास्त झाल्याने तोंड सुकते आणि ओठांच्या कडेची त्वचा फाटू लागते. तसेच हिरड्यांना सूज आणि जीभ आणि गालांच्या आत सफेद डाग तयार होतात.

4 त्वचेच्या तक्रारी वाढतात

ब्लड शुगर वाढल्याने शरीर सगळीकडून पाणी खेचते. यामुळे त्वचा कोरडी पडते. तसेच त्वचेच्या इतर समस्या होऊ लागतात. काहीवेळा नसांचे सुद्धा नुकसान होते.

5 डोळे कमजोर होणे

ब्लड शुगर वाढल्याने शरीर डोळ्यातील लेन्समधून द्रव पदार्थ खेचते. यामुळे डोळे कमजोर होतात. लक्ष केंद्रीत करणे कठिण होते, दृष्टी जाण्याचाही धोका असतो.

6 थकवा जाणवतो

इन्सुलिन कमी तयार होते. इन्सुलिन पेशींमध्ये उर्जा पोहचवण्याचे काम करते. त्याच्या कमतरतेमुळे थकवा जाणवतो.

7 पचनाच्या समस्या

ब्लड शुगर जास्त काळ वाढल्याने वेगस मज्जातंतूचे नुकसान होते. हे मज्जातंतू पोट आणि आतड्यांमध्ये जेवण पोहचवण्यासाठी मदत करतात. यामुळे पचनसंबंधी समस्या जाणवतात.

8 हृदयाच्या धडधडीवर परिणाम

ब्लड शुगर वाढवणारे हार्मोन्स जेव्हा खुप कमी होतात तेव्हा यामुळे हृदयाची धडधड वेगाने आणि अनियमित होते.

9  हात-पाय कापणे

ब्लड शुगर कमी होण्याचा परिणाम नर्व्हस सिस्टमवर पडतो. असे झाल्याने बॉडीतून अड्रेनालाईन सारखे हार्मोन निघते ज्यामुळे हात-पाय कापतात.

10  खुप घाम येणे

ब्लड शुगर खुप कमी होते तेव्हा शरीर ती वाढवण्यासाठी एक प्रकारचे हार्मोन काढते. यामुळे खुप जास्त घाम येतो. एक्सरसाईज, चांगल्या आहाराने हे नियंत्रित होते.

11  बेशुद्धीसारखे वाटणे

मेंदूच्या पेशींना योग्य पद्धतीने काम करण्यासाठी ग्लूकोजची आवश्यकता असते. ग्लूकोजच्या कमतरतेमुळे थकवा, कमजोरी आणि बेशुद्धीसारखे वाटते. डोकेदुखी सुद्धा होते.

 

Anil Parab : ‘माझ्या आणि अधिकाऱ्यांविरोधातील तक्रार पूर्णतः निराधार व खोटी’

भाजप नेत्याचा दावा, म्हणाले – ‘देशमुख, परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर’

Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 1023 रूग्ण कोरोनामुक्त