उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आहारात ‘या’ 5 गोष्टींचा करावा समावेश, ब्लड शुगर लेव्हल राहील कंट्रोलमध्ये

पोलीसनामा ऑनलाइन टीम – उन्हाळ्यात डायबिटीजच्या रूग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी आपण काही खास फूड्सचा आपल्या डाएटमध्ये समावेश करू शकता, ज्यामुळे ब्लड शुगर सुद्धा नियंत्रित होऊ शकते. यासोबतच शरीर हायड्रेट राहण्यासह अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो.

1. काकडी
डायबिटीजच्या रूग्णांसाठी उन्हाळ्यात सर्वात हेल्दी फूड आहे काकडी. यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी खुप कमी असते. तर व्हिटॅमिन आणि पोषकतत्व भरपूर असतात. यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत होते. काकडीचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 आहे.

2. टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम, फोलेट, फायबर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी6, ई, सह अनेक असे गुण असतात जे डायबिटीजसाठी लाभदायक आहेत. याचा ग्लायसेमिक इंडेक्स खुप कमी आहे. यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहते.

3. बेरीज
बेरी जसे की स्ट्राबेरी, ब्लूबेरी, रासबेरी इत्यादी डायबिटीजच्या रूग्णांसाठी चांगले मानले जाते. संशोधनानुसार ब्लूबेरीची स्मूदी प्यायल्याने शरीरात इन्सुलिन वेगाने वाढते.

4. वांगी
वांग्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 15 असतो. यात भरपूर फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि नियासिन आढळते. सोबतच इम्फ्लामेट्री गुण आढळतात जे ब्लड शुगरसह अनेक रोगांशी लढतात.

5. शिमला मिरची
विविध रंगाची शिमला मिरची सेवन करता येते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, थायमीन, फोलिक अ‍ॅसिड सारखे गुण आढळतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल होते आणि वजन कमी होऊ शकते.