मधुमेहग्रस्ताने इन्सुलिन घेतले तरीही ‘ही’ पथ्ये पाळणे आवश्यकच

पोलीसनामा ऑनलाईन टीम – टाइप-२ मधुमेह झालेल्या काही रूग्णांना डॉक्टर इन्सुलिन सुरू करतात. अशा रूग्णांना इन्सुलिन सुरू असल्याने पथ्य पाळण्याची गरज नाही, असा एक गैरसमज आहे. मात्र, मधुमेहाच्या प्रत्येक उपचार पद्धतीत खाण्या-पिण्यातील पथ्य आवश्यक असते. टाइप-१ मधुमेह झालेल्या रूग्णांना इन्सुलिन आवश्यकच असते. टाइप-२ चे काही रुग्ण खाण्यात पथ्य पाळत नसल्याने त्यांच्यावर कुठलेच औषध प्रभावी ठरत नाही. अशा रूग्णांना इन्सुलिन सुरू केले जाते. फास्ट फूड किंवा जास्त स्टार्च असलेले अन्न सेवन केल्याने इन्सुलिनचा डोस वाढवण्याची गरज भासते.

अशाप्रकारे खाण्याचे पिण्याचे पथ्य न पाळल्याने वजन वाढते. त्यातच इन्सुलिनची सक्रियता कमी होऊ लागते. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी वारंवार इन्सुलिन घ्यावे लागू शकते. हे एक वाइट चक्रच असून स्थूलपणा, रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार आणि हृदय विकार हे सर्व एकापाठोपाठ येतात. इन्सुलिनने मधुमेहाचा प्रभावी उपचार करायचा असेल तर आ‌वश्यक तेवढेच अन्न सेवन करावे. पित्ताशयातील बीटा सेल्स इन्सुलिन हार्मोन्स निर्माण करतात. तणाव, अनिद्रा आणि नैराश्याच्या स्थितीत या बीटा सेल्स निष्कामी ठरू लागतात. त्या नष्ट झाल्यास इन्सुलिन तयार होत नाही. त्यामुळे ताण येतो तेव्हा रक्तशर्करेचे प्रमाण वाढते.