Diabetes | तुम्हाला मधुमेह आहे की नाही कसे ओळखाल?, जाणून घ्या याची लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेही रुग्णांनी (Diabetic Patients) आपल्या आहारावर अथवा आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेहाचा आजार (Diabetes) अचानक होत नाही हे सर्वांनाच माहीत आहे. तर याचे काही संकेत फार पूर्वीपासून मिळतात. तसेच, तुम्हाला खूप तहान लागणे, थकवा येणे, वारंवार शौचास जाणे, अचानक वजन कमी होणे, अधिक भूक लागणे, पाय अथवा हाताला मुंग्या येणे असे वाटू शकते. मधुमेह (Diabetes) होण्याआगोदर ही लक्षणे जाणवत असतात.

 

अशा पद्धतीने मधुमेहाची लक्षणे जाणवल्यास आपण ताबडतोब स्वतःची तपासणी करून घ्यावी. कारण जेव्हा तुम्हाला प्री-डायबेटिसची (Pre-Diabetes) लक्षणे जाणवतात तेव्हा तुम्हाला तुमच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी राखण्यासाठी औषधांची आवश्यकता नसते. दरम्यान, अशातच मधुमेहाची लक्षणे जाणवल्यास ताबडतोब तपासणी करून घेणे गरजेचे असते. (Diabetes)

 

1. प्रथम साखर खावू नका (Don’t Eat Sugar) –
आपल्या आहारातून साखरेपासून बनवलेल्या गोष्टी काढून टाका. त्याऐवजी तुम्ही फळे, गूळ अथवा मध (Fruit, Jaggery or Honey) यापासून नैसर्गिक साखर घेऊ शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला प्री-मधुमेहाची लक्षणे दिसली तर तुम्ही योगा करू शकता कारण स्वादुपिंडाच्या चांगल्या कार्यासाठी योगा (Yoga) हा एक चांगला पर्याय आहे.

2. चांगली झोप घेणे महत्वाचे (Getting Enough Sleep Is Important) –
प्रत्येकाला माहित आहे की प्री-मधुमेह असणा-या लोकांनी सात ते आठ तासांची चांगली झोप घेतली पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) मजबूत करण्यासोबतच, चांगली झोप शारीरिक आणि मानसिक तणाव (Physical And Mental Stress) कमी करते आणि हार्मोन्सही योग्य ठेवते.

 

3. योग्य वेळी खाणे-पिणे (Eating And Drinking At The Right Time) –
खाणे-पिणे हे तुमचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
जर तुम्ही प्री-डायबिटीजचे रुग्ण असाल तर जेवणातील अंतरावर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | signs you have diabetes or not how to control blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Side Effects Of AC | जर तुम्ही सुद्धा रोज करत असाल AC चा वापर, तर जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी

 

Thyroid Disease Symptoms And Precautions | थायरॉइडच्या विकारात ‘या’ 3 गोष्टींची विशेष काळजी घ्या, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते

 

Summer Detoxification | उन्हाळ्यात बॉडी हेल्दी ठेवणे आणि डिटॉक्सफिकेशनसाठी अशाप्रकारचा डाएट करा फॉलो