Diabetes | डायबिटीजमुळे सर्वात जास्त प्रभावित होतात शरीराचे ‘हे’ 4 पार्ट, अशी घ्या काळजी

पोलीसनामा ऑनलाइन – आजकाल मधुमेह (Diabetes) हा एक सामान्य आजार झाला आहे. बदलत्या जीवनशैली (Changing Lifestyles) मुळे प्रत्येक दुसरा व्यक्ती या आजाराने त्रस्त आहे. याशिवाय अनेक लोक मधुमेहाची (Diabetes) तपासणीही करून घेत नाहीत, ज्यामुळे त्यांना आपण या आजाराचे रुग्ण आहोत हेच कळत नाही. जाणून घ्या, मधुमेहामुळे शरीराच्या (Diabetes Effect On Body) कोणत्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो.

 

1. किडनीवर होऊ शकतो परिणाम (Kidneys May Get Affected)

जे लोक दीर्घकाळापासून मधुमेहाने त्रस्त आहेत, त्यांना किडनीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कारण, सततच्या हाय ब्लड शुगरमुळे (High Blood Sugar) किडनीच्या लहान रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. या दरम्यान शरीरात सूज येण्यासारखी लक्षणेही दिसू लागतात.

 

2. दृष्टी गमावण्याची भीती (Fear Of Losing Eyesight)

मधुमेहाचा (Diabetes) परिणाम डोळ्यांवरही दिसून येतो. दीर्घकाळापर्यंत ब्लड शुगरचा परिणाम डोळ्यांवर होऊ शकतो. यामुळे तुम्हाला डोळ्यांशी संबंधित समस्यांना (Eye Problems) सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे दृष्टी कमी होण्याचा धोकाही असतो.

 

3. पायांच्या नसांवरही होतो परिणाम (Also Effect On The Nerves Of The Legs)

याशिवाय पायांच्या नसांवरही मधुमेहाचा परिणाम होतो. शरीरातील ब्लड शुगर लेव्हल खूप वाढली की पायाच्या नसा खराब होऊ लागतात. अशा स्थितीत मधुमेही रुग्णांमध्ये पाय सुन्न होण्याची समस्या उद्भवू शकते.

 

4. हृदयविकाराचा धोका (Risk Of Heart Attack)

शेवटचा परिणाम तुमच्या हृदयावरही होतो. जर तुमच्या ब्लड शुगरचे प्रमाण
जास्त काळ सतत वाढत असेल तर त्यामुळे तुमचे हृदय धोक्यात येते.
मधुमेहामुळे आर्टरी ब्लॉकेज (Artery Blockage) होऊ शकते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | these 4 parts of the body are most affected due to diabetes kidney heart leg veins and eyes in danger zone

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा