Diabetes Tips | ‘ही’ भाजी पाण्यात उकळून प्यायल्याने वेगाने कमी होईल Blood Sugar, वाढेल इन्सुलिन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Tips | डायबिटीज (Diabetes) हा एक गंभीर आणि असाध्य रोग आहे. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये शरीर एकतर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा तयार केलेले इन्सुलिन योग्य प्रकारे वापरू शकत नाही. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे जो ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Control) ठेवण्याचे काम करतो. जेव्हा हे शक्य नसते तेव्हा ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Levels) वाढू लागते, ज्यामुळे रुग्णाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. वाढलेल्या शुगरचा इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो जसे की किडनी आणि डोळे. (Diabetes Tips)

 

डायबिटीजचे अनेक प्रकार :
टाईप 1, टाईप 2, टाईप 3, जेस्टेशनल आणि प्री-डायबिटीज. यावर कायमस्वरूपी इलाज नसल्यामुळे रुग्णाला सामान्य जीवन जगण्यासाठी लक्षणे नियंत्रणात ठेवावी लागतात. तुम्ही जे काही खाता आणि पिता ते डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत करते. (Diabetes Tips)

 

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्नपदार्थांची यादी लांबलचक आहे, त्यात रोजची भाजी म्हणून कांद्याचा समावेश आहे. असे मानले जाते की कांद्यामध्ये असे गुणधर्म आढळतात, जे नैसर्गिकरित्या ब्लड शुगर नियंत्रित करू शकतात. डायबिटीजवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांद्याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊया.

 

डायबिटीज कंट्रोल करू शकता कांद्याचा रस
कांद्याशिवाय भाजीची कल्पनाच करता येत नाही यात शंका नाही. कांदा केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर त्याचे अनेक आरोग्य फायदेही आहेत. ’एनव्हायर्नमेंटल हेल्थ इनसाईट्स’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, ताज्या कांद्याचे सेवन टाईप-1 आणि टाईप-2 डायबिटीजमध्ये (Type 1, Type 2 Diabetes) ब्लड शुगर लेव्हल कमी करण्यास मदत करू शकते. कांद्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. याचा अर्थ तो हळूहळू पचलस जातो, ज्यामुळे रक्तप्रवाहात शुगर हळूहळू सोडली जाते.

डायबिटीजमध्ये कसा करावा कांद्याचा वापर
फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशियन शिखा अग्रवाल शर्मा, यांच्या मते, तुम्ही कोणत्याही प्रकारे कांदे वापरू शकता. कांदा ही अशी भाजी आहे जी तुम्ही अनेक प्रकारे खाऊ शकता. भाज्यांव्यतिरिक्त, सूप, स्टॉज, सॅलड किंवा सँडविचमध्ये कांदा वापरू शकता.

 

कांद्याचे पाणी देखील गुणकारी
शुगरचे रुग्ण कांद्याचे पाणी वापरू शकतात. हे एक प्रकारचे लो-कॅलरी डिटॉक्स ड्रिंक आहे जे तुम्ही दररोज सकाळी घेऊ शकता. डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा स्वस्त घरगुती उपाय आहे जो सहज तयार करता येतो.

 

कांद्याचे पाणी कसे तयार करावे
डायबिटीज रुग्णांनी कांद्याचे पाणी बनवण्यासाठी 2 चिरलेले कांदे, 1 कप पाणी, 1 चमचा लिंबाचा रस,
1 चिमूट काळे मीठ घ्या. ब्लेंडरने सर्व साहित्य ब्लेंड करा. ते गाळण्याची गरज नाही कारण त्यातील फायबर देखील फायदेशीर आहे.

 

हे लक्षात ठेवा
मीठ कांद्याचा तिखटपणा कमी करण्यास मदत करते. इच्छा असल्यास मीठ काढू शकता.
जर चव थोडी वाढवायची असेल तर मिश्रणात थोडे मध घालू शकता. डायबिटीज व्यतिरिक्त,
हे मिश्रण इम्युनिटी मजबूत करण्याचे काम करते. कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात.
मात्र, त्याचे जास्त सेवन करणे टाळावे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Tips | according to celebrity nutritionist diabetics drink onion water to control blood medicine without medicine

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | पिंपरी चिंचवडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा टेम्पो पकडला

 

Gold Price Today | सोने-चांदीच्या किंमतीत मागील आठवड्यातील घसरणीनंतर आज दिसत आहे तेजी, जाणून घ्या नवीन दर

 

Cyrus Mistry Car Accident | अपघातात सायरस मिस्त्रींचा मृत्यू, मर्सिडीज चालवणार्‍या ‘अनाहिता पंडोले‘ कोण आहेत?