Diabetes | स्वयंपाक घरातील ‘या’ मसाल्याने कंट्रोल होईल ब्लड शुगर, डायबिटीजच्या रूग्णांनी असा करावा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes | मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर (Blood Sugar Level) नेहमी लक्ष ठेवावे लागते, अन्यथा इतर अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. मधुमेही रुग्णांनी (Diabetes) असा सकस आहार घ्यावा ज्यामुळे त्यांचे आरोग्य सुधारेल. स्वयंपाकघरात हळद वापरल्यास ग्लुकोजची पातळी नियंत्रित ठेवता येऊ शकते (Turmeric For Diabetes).

 

मधुमेहाच्या रुग्णांनी अवश्य खावी हळद
हळद (Turmeric) हा एक मसाला आहे ज्याचा वापर अनेक भाज्या आणि पाककृती तयार करण्यासाठी केला जातो, परंतु तुम्हाला हे माहित नसेल की हळदीच्या सेवनाने मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना देखील फायदा होऊ शकतो.

 

हळद खाण्याचे फायदे
1. आपल्या रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) वाढल्याने ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) सुद्धा वाढते. हळदीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म वाढत्या ग्लुकोजला नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याचे नियमित सेवन केल्यास मायग्रेनसारख्या त्रासापासूनही दिलासा मिळेल. यासाठी तुम्ही पाण्यात हळद मिसळून पिऊ शकता. तसेच हा मसाला दुधात मिसळून प्यायल्यास ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. याशिवाय न्याहारीमध्ये दूध, हळद आणि काळी मिरी (Black pepper) मिसळून सेवन केल्यास मधुमेहाच्या रुग्णांना निश्चितच आराम मिळतो.

2. रक्तस्त्राव थांबवण्यासाठीही हळदीचा (Turmeric) उपयोग होतो. जेव्हा तुम्हाला दुखापत होईल तेव्हा या मसाल्याची पेस्ट बनवा आणि प्रभावित भागात लावा. याशिवाय सांधेदुखी (Joint Pain) पासून आराम मिळवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो.

 

3. सर्दी, खोकला (Cough and Cold) असल्यास हळदीचे दूध (Turmeric Milk) अवश्य प्यावे, लवकर आराम मिळतो. ज्या लोकांचे युरिक अ‍ॅसिड (Uric Acid) वाढले आहे त्यांनी रोज हळद आणि दूध मिसळून प्यावे.

 

4. हळदीमध्ये (Turmeric) असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इम्फ्लेमेटरी गुणधर्म इम्युनिटी वाढवतात,
ज्यामुळे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण मिळते. या मसाल्यामुळे पचनक्रिया चांगली राहते,
त्यामुळे इतर अनेक समस्यांपासून सुटका मिळते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes | turmeric milk water for type 2 diabetes blood sugar level control cholesterol joint pain cough cold

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीर संबंध; २५ लाखांचे कर्ज घेऊन केले दुसर्‍याच तरुणीशी लग्न

 

Pune Rickshaw Fare Increase | पुण्यात रिक्षाचा प्रवास आणखी वाढणार? दरवाढीचा पुनर्विचार; जिल्हाधिकाऱ्यांचे संघटनांना आश्वासन

 

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा