Diabetes | मधुमेह ‘कंट्रोल’ करायचाय तर नाश्ता करताना अजिबात करू नका ‘ही’ चूक; जाणून घ्या

Advt.

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मधुमेह (Diabetes) एक असा आजार आहे जो आता कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ लागला आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मधुमेहाची प्रकरणे वाढू शकतात. मधुमेहामुळे (Diabetes) होणार्‍या इतर गंभीर आजारांमुळे डॉक्टर, लोकांना मधुमेहापासून बचाव करण्याचा सल्ला देतात.

एका नवीन संशोधनात एका विशिष्ट वेळेत डाएट घेणार्‍या लोकांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता नाहीच्या बरोबर असते. हे संशोधन नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केले आहे. आणि अलिकडेच या संशोधनाचे एंडोक्राइन सोसायटीच्या वार्षिक बैठकीत विश्लेषण करण्यात आले.

खाण्याच्या वेळेचा शरीरावर परिणाम –
10,575 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनात लोकांचा डाएट डेटा, फास्टिंग ग्लुकोज आणि इन्सुलिनवर सर्वे करण्यात आला. संशोधकांना आढळून आले की, लोकांच्या नाश्ता करण्याच्या वेळेचा ब्लड शुगरवर खुप परिणाम होतो.

संशोधकांनुसार सकाळी उशीराने ब्रेकफास्ट करणार्‍यांच्या तुलनेत सकाळी 8.30 वाजण्यापूर्वी ब्रेकफास्ट करणार्‍यांमध्ये ब्लड शुगरचा स्तर (Diabetes) आणि इन्सुलिन रेजिस्टेन्स खुप कमी आढळून आले. प्री-डायबिटीज आणि डायबिटीजच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर आणि हार्मोन इन्सुलिन वाढणे धोक्याचा संकेत असतो.

खाण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त वेळ देणे आवश्यक –
संशोधनात सकाळी 8:30 वाजतानंतर नाश्ता करणार्‍यांमध्ये ब्लड शुगर आणि इन्सुलिन दोन्ही वाढलेले आढळले.
सध्या वजन नियंत्रणासाठी विविध प्रकारचे डाएटिंग तंत्र वापरले जाते.
अनेक संशोधनात दावा केला जातो की, एका ठराविक काळात थोडे-थोडे खाण्याने मेटाबॉलिक हेल्थमध्ये सुधारणा होते.

मात्र, या नवीन स्टडीमध्ये थोड्या-थोड्या वेळात खाल्ल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स वाढलेला आढळून आला.
परंतु ब्लड ग्लूकोजमध्ये काहीही विशेष बदल आढळून आला नाही. एक्सपर्टचे म्हणणे आहे की,
थोड्या-थोड्या वेळाने खात राहण्यापेक्षा चांगले आहे की, तुम्ही खाण्याला पूर्णवेळ द्यावा. परंतु तुम्ही कधी खात आहात यास महत्व द्या.

Web Title :-  Diabetes | type 2 diabetes eating time lowers risk blood sugar metabolic syndrome

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

Pune Anti Corruption | 70 हजाराच्या लाचेची मागणी करणाऱ्या तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यासह खासगी इसमावर FIR

Essential Tests For Women | 30 वर्षानंतर महिलांनी अवश्य केल्या पाहिजेत ‘या’ 5 टेस्ट; जाणून घ्या