×
Homeआरोग्यDiabetes Ultrasound Treatment | ना औषध, ना इंजेक्शन, आता अल्ट्रासाऊंडने होईल डायबिटीजचा...

Diabetes Ultrasound Treatment | ना औषध, ना इंजेक्शन, आता अल्ट्रासाऊंडने होईल डायबिटीजचा उपचार! शास्त्रज्ञांना मिळाले मोठे यश

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Diabetes Ultrasound Treatment | मधुमेहावर उपाय शोधण्यात गुंतलेल्या शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे. त्यांनी अल्ट्रासाऊंडच्या मदतीने टाइप-2 मधुमेहावर नियंत्रण मिळवले आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या उपचारात ना औषधांची गरज होती ना इंजेक्शनची. या दरम्यान, लिव्हरमध्ये एका विशिष्ट ठिकाणी अल्ट्रासाऊंड किरण सोडले गेले, ज्यामुळे शरीरातील इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली. (Diabetes Ultrasound Treatment)

 

मात्र, हे तंत्रज्ञान अद्याप चाचणीच्या टप्प्यात आहे. तीन प्रकारच्या प्राण्यांवर त्याचा वापर केल्याने उत्साहवर्धक परिणाम मिळाले आहेत. आता त्याचा मानवांवर वापर करण्याची तयारी सुरू आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की जर हे तंत्रज्ञान यशस्वी झाले तर आगामी काळात अशी छोटी उपकरणे बनवली जाऊ शकतात, ज्याच्या मदतीने लोक घरच्या घरी मधुमेहावर उपचार करू शकतील. (Diabetes Ultrasound Treatment)

 

अमेरिकेतील जीई रिसर्चच्या टीमने हा प्रयोग केला आहे. या टीममध्ये येल स्कूल ऑफ मेडिसिन आणि फेनस्टाईन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चचे शास्त्रज्ञ देखील आहेत. नेचर बायोमेडिकल इंजिनिअरिंग या जर्नलमध्ये लेख लिहून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

 

या तंत्राला पेरिफेरल फोकस्ड अल्ट्रासाऊंड स्टिम्युलेशन (pFUS) असे नाव देण्यात आले आहे. शास्त्रज्ञांच्या टीमने प्रयोगादरम्यान निरीक्षण केले की लिव्हरच्या आत संवेदना निर्माण करणार्‍या मज्जातंतूंना अल्ट्रासाऊंडच्या किरणांद्वारे उत्तेजित केले जाऊ शकते.

 

शास्त्रज्ञांनी नेचर मॅगझिनला सांगितले की, आम्ही लिव्हरच्या porta hepatis नावाच्या भागावर लक्ष केंद्रित केले. इथे मणक्यातून येणार्‍या नसांचे जाळे असते. हेच आपल्या मेंदूला शरीरातील ग्लुकोज आणि पोषक तत्वांच्या पातळीबद्दल माहिती पाठवते.

त्यांच्याबद्दल जाणून घेणे कठीण आहे कारण त्या खूपच लहान आहेत.
शास्त्रज्ञांनी सांगितले की प्रयोगादरम्यान, आम्ही लिव्हरच्या या भागात pFUS अल्ट्रासाऊंड किरण सोडले.

 

यामुळे हाय ब्लड शुगर पुन्हा सामान्य करण्यात यश आले. त्यांनी सांगितले की आतापर्यंत हे तंत्र उंदीर आणि डुकरांमध्ये यशस्वीरित्या वापरले गेले आहे.
या प्रयोगादरम्यान, अल्ट्रासाऊंड किरण केवळ 3 मिनिटांसाठी सोडण्यात आले,
ज्यामुळे प्राण्यांमधील मधुमेहाची पातळी सामान्य झाली. आता त्याचा मानवांवर वापर करण्याची तयारी सुरू आहे.

 

शास्त्रज्ञांना अशी आशा आहे की, हे तंत्र मानवावरही यशस्वी झाले तर मोठ्या आजारापासून मुक्ती मिळण्याची आशा आहे.
भविष्यात अशी छोटी उपकरणे बनवता येतील, ज्याचा वापर लोक घरच्या घरी करू शकतील
आणि दिवसातील काही मिनिटांच्या वापराने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येईल.

 

यासाठी त्यांना कोणतेही औषध खावे लागणार नाही आणि इन्सुलिनचे इंजेक्शनही घ्यावे लागणार नाही. मधुमेहावरील उपचारात हे तंत्रज्ञान गेमचेंजर ठरेल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Ultrasound Treatment | diabetes treatment us scientists control sugar level using ultrasound during trials in animals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Low Blood Sugar | व्हिटामिन-D च्या कमतरतेने होते लो ब्लड शुगर, जाणून घ्या ताबडतोब शुगर लेव्हल वाढवण्यासाठी काय करावे

 

Blood Sugar कंट्रोल करण्यासाठी रोज ‘या’ 3 गोष्टींचे करू शकता सेवन; जाणून घ्या

 

Diabetes Control | डायबिटीजच्या रूग्णांसाठी इन्सुलिनपेक्षा कमी नाहीत ‘या’ 6 पाच वनस्पती, वाढू देत नाहीत ब्लड शुगर

Must Read
Related News