Diabetes Warning | पायांवर दिसतात डायबिटीजचे ‘हे’ 3 संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतात गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांच्या (Diabetes Patients) संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. हा असा आजार आहे की एकदा झाला की तो आयुष्यभर तुमच्यासोबत राहतो. मधुमेहामध्ये, शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा शरीर जितके इन्सुलिन बनवते तितके वापरण्यास सक्षम नसते (Diabetes Warning). अंधुक दृष्टी, मोतीबिंदू, ग्लूकोमा, जखम बरी न होणे, थकवा, वारंवार डोकेदुखी, इम्युनिटी कमजोर होणे, हृदयाची धडधड वाढणे, वारंवार लघवी होणे ही मधुमेहाची लक्षणे असू शकतात (Diabetes Warning).

 

मधुमेहाची काही नवीन लक्षणे समोर आली आहेत, जी व्यक्तीच्या पायात दिसतात (Diabetes Symptoms On Feet). अनेक वेळा एखादी व्यक्ती या लक्षणांकडे सामान्य मानून दुर्लक्ष करते. परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायात ही 3 लक्षणे दिसली तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांना भेटा (Diabetes Warning Symptoms On Your Feet You Should Never Ignore).

 

मधुमेहाच्या या 3 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष (Don’t Ignore These 3 Symptoms Of Diabetes)
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसनुसार (National Institute Of Diabetes And Digestive And Kidney Diseases) प्रत्येकाने दररोज पाय तपासले पाहिजेत आणि पायात काही फरक दिसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा. पाय लाल होणे, पाय गरम होणे किंवा पायात सूज येणे, हे दीर्घकाळ ब्लड शुगर लेव्हल जास्त राहण्याचे लक्षण असू शकते. परंतु हे चारकोट फूट (Charcot’s Foot) नावाच्या स्थितीमुळे देखील होऊ शकते. यामुळे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरच सांगू शकतील.

या गोष्टींकडेही लक्ष द्या (Pay Attention To These Things)
मधुमेह (Diabetes) असलेल्या लोकांनी कापणे, जखम, लाल ठिपके, सूज किंवा फोड आणि पायाची नखे यावर लक्ष ठेवावे, कारण या सर्वांमुळे संसर्ग होऊ शकतो (Diabetes Warning). जेव्हा एखाद्याला मधुमेह असतो तेव्हा शरीर पुरेसे इंसुलिन तयार करण्यासाठी खूप मेहनत घेते किंवा इन्सुलिन शरीरावर परिणामकारक नसते.

 

टाईप 1 मधुमेहामध्ये (Type 1 Diabetes) स्वादुपिंड इन्सुलिन तयार करत नाही आणि टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिरोधक बनतात,
त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल सामान्य ठेवण्यासाठी अधिक इन्सुलिनची आवश्यकता असते.
पण जर तुम्ही तुमची ब्लड शुगर नियंत्रणात ठेवली नाही तर ते धोकादायक ठरू शकते.

 

एनएचएस म्हणते की तुम्ही घरी तुमच्या ब्लड शुगर लेव्हलचे निरीक्षण केल्यास,
सामान्य शुगर लेव्हल जेवणापूर्वी 4 ते 7 mmol/l असावी आणि जेवणानंतर 2 तासांनी 8.5 ते 9 mmol/l पेक्षा कमी असावी.

 

Web Title :- Diabetes Warning | diabetes warning symptoms on your feet you should never ignore

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes च्या रूग्णांचे असे असावे दुपारचे जेवण, ‘या’ वस्तूच्या भाकरीसोबत खा ‘ही’ डाळ

 

Fruits And Vegetables For Asthma | ‘या’ फळे आणि भाज्यांमुळे होतात दम्याची लक्षणे कमी; जाणून घ्या

 

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता डायबिटीज