Diabetic Patient Diet | मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावे? रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ 5 पदार्थ प्रभावी, आहारात करा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diabetic Patient Diet | सध्याच्या काळात मधुमेह (diabetes) हा आजार खूप सामान्य झाला आहे, परंतु तरीही हा एक अतिशय धोकादायक आजार मानला जातो. कारण त्याची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रणात (Control) ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. (Diabetic Patient Diet)

 

बहुतेक रुग्णांना डाएट चार्ट (Diabetic Patient Diet Chart) पाळता येत नाही. अशा स्थितीत त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. मधुमेहाच्या रुग्णांना लठ्ठपणा (Obesity), BP, जळजळ (Inflammation), डोळ्यांच्या समस्या (Eye Problem), पक्षाघात (Paralysis)

 

इत्यार्दीचा धोका वाढतो.
मधुमेहामध्ये रुग्णांच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढते, त्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे इतर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. हा आजार एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, ज्यामुळे रुग्णांनी त्यांची जीवनशैली आणि आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. (Diabetic Patient Diet)

 

मधुमेहाच्या रुग्णांनी कोणत्या 5 गोष्टी आपल्या नियमित आहारात घेतल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहू शकते ते जाणून घेवूयात…

 

1. सकाळची सुरुवात (Morning Start):
आचार्य श्री बाळकृष्ण यांच्या मते, मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळची सुरुवात अर्धा चमचा मेथी पावडर ग्लासभर पाण्यात टाकून करावी. तसेच एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवलेले बार्ली गाळून सकाळी प्यावे. एक तासानंतर, रुग्णाने शुगर-फ्री चहासह खारट बिस्किटे खावीत.

2. दुपारचे जेवण (Lunch) :
दुपारच्या जेवणात मधुमेही रुग्णाने 2 चपाती, एक वाटी डाळ, एक वाटी भाजी, दही आणि एक प्लेट सलाड खावे. तसेच, संध्याकाळच्या स्नॅकमध्ये बिगर साखर ग्रीन टी, नमकीन किंवा कोणताही बेक केलेला नाश्ता घेऊ शकता.

 

3. कारले (Bitter Gourd-Karli) :
मधुमेहाचा त्रास असणार्‍या लोकांना कारले खाण्याचा सल्ला आरोग्य तज्ञ देतात. तुम्ही कारल्याची भाजी किंवा रस घेऊ शकता. या हिरव्या भाजीमध्ये फायटोकेमिकल्स जास्त प्रमाणात असतात, जे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

 

4. टोमॅटो (Tomato):
‘व्हिटॅमिन-सी’चा (Vitamin C) उत्तम स्रोत असलेला टोमॅटो रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे. तसेच ही भाजी इम्युनिटी वाढवण्यासही मदत करते.

 

5. काजू (Cashews) :
काजूमध्ये प्रथिने (Protein), फोलेट, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सेलेनियम, खनिजे, आयर्न, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स,
जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. काजूमधील पोषक घटक रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.
अशा परिस्थितीत मधुमेही रुग्ण भाजलेले काजू नाश्ता म्हणून खाऊ शकतात.

 

 

Web Title :- Diabetic Patient Diet | what should diabetic patients eat these 5 foods are effective in controlling blood sugar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

FMCG Companies | सामान्य ग्राहकांना झटका ! महाग झाले AC आणि फ्रिज, 10 टक्केपर्यंत वाढतील वॉशिंग मशीनचे दर; जाणून घ्या कारण

Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसचा खासगी फोटो लीक, जॅकलिन हात जोडून म्हणाली-‘मी कठीण काळातून जात आहे…’

Omicron Positive | ओमिक्रॉन पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर होऊ नका अस्वस्थ, आवश्य करा ‘हे’ 4 उपाय; जाणून घ्या