Diagnosis of Covid-19 | कोरोना रूग्णाच्या मृत्यूला कधीपर्यंत नाही मानलं जाणार ‘कोविड-डेथ’, सर्वोच्च न्यायालयात मोदी सरकारनं सांगितलं; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाने मृत्यूच्या (Diagnosis of Covid-19) मृत्यूप्रकरणात नुकसान भरपाईच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती, यावर केंद्र सरकारने (Central Government) प्रतिज्ञापत्र दाखल करताना दोन महत्वाचे गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट ही की केंद्र सरकार प्रत्येक कोरोना मृत्यूवर कुटुंबियांना 4-4 लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही. कारण असे केल्यास SDRF चा फंड संपण्याची शक्यता आहे. आता सोमवारी (21 जून) पुढील सुनावणी होईल. Diagnosis of Covid-19 | all deaths with a diagnosis of covid 19 to be classified as deaths due to corona virus center says in affidavit in supreme court

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे, सर्वांना कोविड डेथ मानले जाईल. सोबतच ठरलेल्या नियमांचे पालन न करणार्‍या डॉक्टरांविरूद्ध कठोर कारवाईबाबत म्हटले आहे.

कोविड डेथ मानण्याचा अर्थ काय?
जर एखाद्या व्यक्तीला इतर कोणता गंभीर आजार सुद्धा होता आणि त्या दरम्यान कोरोना संसर्ग झाला, नंतर त्याचा मृत्यू झाला तर त्यास कोविडने मृत्यूच मानले जाईल. परंतु, केंद्राने प्रतिज्ञापत्रात काही इतर गोष्टीही स्पष्ट केल्या आहेत, यामध्ये म्हटले आहे की, जर स्पष्टपणे मृत्यूचे कारण, कोरोना नव्हे दुसरे काही दिसत असेल तर त्यास कोरोनाने झालेला मृत्यू मानले जाऊ शकत नाही. यामध्ये उदाहरण म्हणून अचानक झालेला अपघात, विष खाणे, हार्ट अटॅक इत्यादीचा समावेश आहे.

कोरोना मृत्यूच्या प्रमाणापत्रावर वेगळे कारण का
दाखल याचिकेत म्हटले होते की.
कोरोना पीडितांच्या मृत्यू प्रमाणपत्रात (Death certificate) कोरोनाचा उल्लेख नाही.
ज्यामुळे कुटुंबियांना भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात.
यावर कोर्टाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले होते की.
कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर सुद्धा डेथ सर्टिफिकेटवर हार्ट फेल किंवा फुफ्फुसात समस्या का लिहिले जात आहे.

आता केंद्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की.
कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये कोविडच्या रूपात प्रमाणित केले आहे.
सोबतच कोरोना मृत्यूला प्रमाणित करण्यात चुक करणार्‍या संबंधित पदाधिकारी डॉक्टरांवर दंडात्मक कारवाई (Action) केली जाईल.

सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेत केंद्र आणि राज्य सरकारांना आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अंतर्गत कोरोनाने झालेल्या मृत्यूसाठी कुटुंबियांना 4-4 लाख रुपयांची भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती.

Web Titel :- Diagnosis of Covid-19 | all deaths with a diagnosis of covid 19 to be classified as deaths due to corona virus center says in affidavit in supreme court

 Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Weather Forecast | हवामान विभागाने दिला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात जोरदार पावसाचा इशारा; 27 जूननंतर पडणार ‘धो-धो’

SBI New Rule | 1 जुलैपासून ATM मधून पैसे काढणे होईल महाग, ‘या’ नियमांमध्ये सुद्धा होणार बदल, जाणून घ्या

PPF Account | कितीवेळा वाढवू शकता PPF अकाऊंटचा कालावधी, जाणून घ्या नियम

SBI ग्राहकांनी लक्ष द्यावे ! 10 दिवसांच्या आत करा ‘ही’ कामे अन्यथा करू शकणार नाही पैशांचे व्यवहार, बंद होऊ शकते खाते