आता एका कॉलवर मिळणार ‘कोरोना’शी संबंधित सर्व मदत, आयुष मंत्रालयानं जारी केला हेल्पलाइन नंबर, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसची दुसरी लाट आता कमजोर पडताना दिसत आहे. कोरोनाची प्रकरणे कमी होत असली तरी धोका अजून कमी झालेला नाही. आयुष मंत्रालयाने कोविडमुळे उत्पन्न आव्हानांसाठी आयुष आधारित दृष्टिकोण आणि निराकरण यासाठी समर्पित सार्वजनिक हेल्पलाईन सुरू केली आहे. आयुषच्या विविध शाखा – आयुर्वेद, होमियोपॅथी, योग, नैसर्गिक उपचार, युनानी आणि सिद्धचे हेल्पलाईन तज्ज्ञ सामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असतील.

हे तज्ज्ञ रूग्णांना सल्ला देतील तसेच त्यांना जवळ उपलब्ध आयुष सुविधांबाबत माहिती देतील. टोल-फ्री नंबर 14443 आहे. हेल्पलाईन संपूर्ण भारतात सकाळी 6 वाजल्या पासून दुपारी 12 वाजेपर्यंत आठवड्यातील सर्व सातही दिवस सुरू राहील. तज्ज्ञ रूग्णांना कोविड पूनर्वसन आणि व्यवस्थापनसंबंधी सल्ला देतील. हेल्पलाईन आयव्हीआर (इंटरअ‍ॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स) सुविधायुक्त आहे आणि हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. नंतर इतर भाषांचा सुद्धा समावेश केला जाईल.

हेल्पलाईन सुरूवातीला एकाचवेळी 100 कॉल घेईल आणि भविष्यात आवश्यकतेनुसार क्षमता वाढवली जाईल. हेल्पलाईनच्या माध्यमातून आयुष मंत्रालयाचा उद्देश कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांमध्ये योगदान देणे आहे. हा प्रयत्न एनजीओ प्रोजेक्ट स्टेपवन द्वारे समर्थित आहे.