कामाची गोष्ट ! रेल्वेने प्रवास करताय तर ‘हा’ नंबर नक्की लक्षात ठेवा, फक्त एका क्रमांकावरून मिळतील 9 सुविधा, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : जर आपण ट्रेनने प्रवास करत असाल तर एक नंबर लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक, भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या क्रमांकाऐवजी एक विशेष क्रमांक जारी केला आहे जेणेकरुन लोकांना एकाच वेळी सर्व सुविधा मिळतील. तो म्हणजे 139. हा नंबर डायल केल्यानंतर तुम्हाला 1 ते 9 पर्यंत पर्याय मिळतील आणि प्रत्येक पर्यायात तुम्हाला वेगळी सुविधा मिळेल.

या सुविधा असतील उपलब्ध
1. सुरक्षे संबंधित कोणतीही मदत
2. तुम्ही ट्रेनशी संबंधित कोणतीही तक्रार करू शकता
3. पार्सल किंवा मालभाड्या संबंधित माहिती
4. कोणत्याही प्रकारची वैद्यकीय मदत त्वरित दिली जाईल.
5. आपल्याकडे कोणत्याही स्टेशनवर आवश्यक सुविधा नसल्यास आपण तक्रार करू शकता
6. तुमच्या तक्रारीचा मागोवा घेऊ शकतो.
7. जर एखादा अपघात झाला असेल तर आपण माहिती घेऊ किंवा देऊ शकता
8. कोणतीही दक्षता माहिती
9. इतर कोणतीही माहिती
10. याशिवाय आपण कॉल करून कॉल सेंटरच्या अधिकाऱ्यांशी बोलू शकता.

सर्व जुने नंबर बंद
आपल्या ट्विटमध्ये रेल्वे मंत्रालयाने हेही स्पष्ट केले की प्रथम वेगवेगळ्या सुविधांना वेगवेगळे क्रमांक मिळत होते. 182 आणि 138 प्रमाणे. प्रवाशांना हे लक्षात ठेवणे अवघड होते, म्हणून सर्व पर्याय 139 हेल्पलाईन क्रमांकावर विलीन केले गेले. या नंबरद्वारे 12 भाषांमध्ये माहिती मिळू शकते.