खुशखबर ! आता फक्त 16 रुपयांत होणार ‘डायलिसिस’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुंबई महापालिकेने किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा दिला असून खासगी संस्थांच्या मदतीने लवकरच एक डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असून यामार्फत रुग्णांना स्वस्तात सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणात किडनीचे आजार असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डायलिसिस करावे लागते. मात्र हि उपचार पद्धती मोठ्या प्रमाणात महाग असल्यामुळे अनेकांना हा खर्च परवडत नाही.

महापालिका भायखळा येथील मुक्ती फौज दवाखान्यात एका खासगी संस्थेला जागा उपलब्ध करून देणार असून याठिकाणी केवळ १६ रुपयात रुग्णांना हि डायलिसिस सेवा मिळणार आहे. या ठिकाणी २५ डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार असून हि जागा ‘सहारा एज्युकेशनल अ‍ॅण्ड मेडिकल चॅरिटेबल ऑर्गनायझेशन’ या संस्थेला पाच वर्षांसाठी देण्यात आली आहे. त्याचबरोबर हि संस्था याठिकाणी हि सेवा देखील देणार आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने या संदर्भात हि माहिती दिली आहे. या केंद्रासाठी महापालिकेच्या सुधार समितीने मंजुरी दिली असून पुढील तीन महिन्यात हे केंद्र सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यानंतर उशीर झाल्यास या संस्थेकडून दंड आकारण्यात येणार आहे. या ठिकाणी हि संस्था सर्व वातानुकूलीत सेवा उभारणार असून मनुष्य बळ देखील तेच पुरवणार आहेत.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून मोठ्या प्रमाणात पैश्यांची बचत होणार आहे. त्याचबरोबर हे केंद्र दोन शिफ्टमध्ये काम करणार असून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा देण्याचा प्रयत्न  असणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –