सोन्याच्या Mask नंतर आता बाजारात विकले जातायेत ‘हिरे’जडीत मास्क ! किंमत लाखांच्या घरात, जाणून घ्या

सूरत : वृत्तसंस्था – कोरोनाच्या संकटामुळं सर्वकाही ठप्प आहे. इतरांप्रमाणे सोन्याच्या व्यापाऱ्यांनाही मोठा तोटा सहन करावा लागत आहे. सूरतमध्ये एका व्यापाऱ्यानं एक अनोखी शक्कल लढवली आहे. त्यानं हिरेजडीत मास्क म्हणजेच डायमंड मास्क (Diamond Mask) तयार केले आहे ज्याची किंमत लाखांच्या घरात आहे.

एन 95 तसेच 3 प्लाय प्रोटेक्शन असणाऱ्या मास्कवर हिऱ्यांची रचना करण्यात आलीये

एका हिरेव्यापाऱ्यानं शक्कल लढवली आणि हिरेजडीत मास्क बाजारात आला. दीपक चौकसी असं या व्यापाऱ्याचं नाव आहे. एन 95 तसेच 3 प्लाय प्रोटेक्शन असणाऱ्या मास्कवर हिऱ्यांची रचना करण्यात आलीये. त्यामुळं तुम्हाला वेगवेगळे मास्क उपलब्ध आहेत. व्यापाऱ्यानं असंही सांगितलं आहे की, हे मास्क आता ग्राहकांनाही आवडत आहेत.

मास्कमध्ये खरे तसेच सिंथेटीक असे दोन्ही प्रकारचे हिरे
व्यापाऱ्यानं तयार केलेल्या या डायमंड मास्कमध्ये खरे तसेच सिंथेटीक असे दोन्ही प्रकारचे हिरे लावण्यात आले आहेत. यात वेगवगळे आकारही आहेत.

प्रथम ‘वधु-वरा’साठी तयार करण्यात आले होते ‘हिरेजडीत मास्क’
चौकसी सांगतात, लग्नासाठी ग्राहकांकडून विविध डिझाईनची मागणी केली जाते. यामुळं वधु आणि वरासाठी प्रथम हे हिरेजडीत मास्क तयार करण्यात आले होते. या मास्कवर पातळ गोल्ड कास्केट फिट केलं जातं आणि त्यावर हिरे सजवले जातात.

किती आहेत किंमत ?
किंमतीबद्दल बोलायचं झालं तर सिंथेटीक हिऱ्यांच्या मास्कच्या किंमती 1 ते दीड लाखांपर्यंत आहेत तर खऱ्या हिऱ्यांच्या किंमती साडेचार लाखांच्या घरात आहेत. हिऱ्यांच्या संख्येबद्दल बोलायचं झालं तर ग्राहकांच्या मागणीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार मास्कवर 150 ते 400 हिरे जडवले जातात.