पुणे : डायमंड चोर आरपीएफच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

प्रवासादरम्यान महिलेची पर्स पळवून त्यामधील सोन्याचे दागिने आणि डायमंडसह रोकड पळवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आरपीएफकडून आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ५ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आरपीएफने रविवारी (दि.२) केली.
[amazon_link asins=’B076Y4P7NQ,B07D9G1GHB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c986561f-af62-11e8-8b03-153e85cbc2a7′]

मोहम्मद अल्लाबक्ष मोहम्मद इसमाईल (वय- १९ रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. डायमंड,
अजमेर -मैसूर एक्सप्रेस गाडीच्या वातानुकुलीत डब्यातुन एका महिलेची पर्स चोरीला गेली होती. या पर्समध्ये ७ लाख ५८ हजार ४९९ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरीला गेला होता. ही घटना ७ जुलै रोजी पुणे रेल्वे स्थानकावर घडली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरपीएफच्या पोलिसांनी एक पथक तयार केले होते. पथकाने पुणे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोहम्मद इसमाईल याला अटक केली.

जाहिरात

 

आरोपी ईसमाईलकडे चौकशी केली असता त्याने रविवारी (दि.२) कोटी-बेंगलोर एक्सप्रेसच्या वातानुकुलीत डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरल्याची कबुली दिली. हा गुन्हा त्याने मिरज रेल्वे स्थानकादरम्यान केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून आरपीएफ पोलिसांनी एक लेडीज पर्स, एक पाकीट, डायमंड, सोन्याचे दागिने असा एकूण ५ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आरपीएफ पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीला लोहमार्ग एलसीबीच्या ताब्यात देण्यात आले आहे.

“मनी ट्रेल” चे पुरावे सादर करा : प्रकाश आंबेडकर

चोरीसाठी ए.सी. डब्यातून प्रवास
अटक करण्यात आलेला आरोपी हा कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवाशी आहे. तो चोरी करण्यासाठी पुण्यात येत होता. पुण्यात येत असताना तो रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यात आरक्षण करून प्रवास करत होता. पुण्यात आल्यानंतर तो डब्यातील महिला प्रवाशांच्या पर्सची चोरी करीत होता. आरोपीवर कर्नाटकात देखील चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

थेऊर जवळील नदीत महिलेसह दोन मुले बुडाली

ही कारवाई आरपीएफ विभागीय आयुक्त विकास ढाकने, सहायक आयुक्त मकारीरीया यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सुनील चाटें, उप निरीक्षक विजयपाल सिंह, संतोष बड़े, हरीश खोकर, विशाल माने, युवराज गायकवाड यांच्या पथकाने केली.

जाहिरात