#VideoViral : कान्स फेस्टीवलमध्ये अशा अवतारात दिसली डायना पेंटी,

कॉफी न मिळाल्याने केली चिडचिड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कान्स फिल्म फेस्टीवल मधील डायना पेंटीचा रेड कारपेटवरील लुक समोर आला आहे. त्यात ती एखाद्या परीपेक्षा कमी दिसत नाही. रेड कारपेटवर वॉक करताना डायनाने बेबी पिंक कलरचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. डायनाच्या या गाऊनवर फेदर डिझाइनही होती. या आऊटफिटला मॅच करणारे इयररिंगही तिने वापरले होते. डायनाचा हा सुंदर बॉल गाऊन Nedret Taciroglu डिझाईन केला होता.

अशातच डायनाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. डायना पेंटीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. यात ती कॉफी न मिळाल्याने चिडताना आणि ओरडताना दिसत आहे. सोबतच डायनाने एक नवीन लुक कॅरी केल्याचे दिसत आहे. तसं तर हे कॉफीसाठी ओरडणं केवळ ॲक्टींगचा एक भाग होता.

दरम्यान कान्स फिल्म फेस्टीवल 2019 मध्ये मल्लिका शेरावत, दीपिका पादुकोण, प्रियंका चोपडा, डायना पेंटी, हुमा कुरेशी, ऐश्वर्या रॉय बच्चन, सोनम कपूर आणि हिना खान यांनीही उपस्थिती दर्शवली होती. प्रत्येकीने वेगळे आणि लक्षवेधक लुक केल्याचे दिसून आले. त्यांचे रेड कारपेटवरील लुक अनेक दिवसांपासून चर्चेत असल्याचे दिसत आहे.

Loading...
You might also like