फार कमी चित्रपटात काम केलेल्या’ या’ अभिनेत्रीने दीपिका पादुकोणला केले होते ‘रिप्लेस’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री डायना पेंटी आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करीत आहे. २०११ मध्ये डायना इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ चित्रपटाद्वारे डेब्यू करणार होती. तिला रणबीर कपूर अप्रोच केले होते पण मॉडेलिंगच्या अनेक कॉन्ट्रॅक्टमुळे तिने हा चित्रपट नाकारला. त्यानंतर नरगिस फाखरीला या चित्रपटात

2012 मध्ये डायना पेंटीने ‘कॉकटेल’ चित्रपटातून डेब्यू केला होता. इम्तियाज अली यांनी तिचे नाव दिग्दर्शक होमी अदजानियाला सुचविले. या चित्रपटात दीपिका पादुकोणसोबत डायना आहे. चित्रपटात डायनाने मीरा नावाच्या एका साध्या मुलीची भूमिका साकारली जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

चित्रपटांपूर्वी डायनाने मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये खूप नाव कमावले होते. कॉलेजच्या दिवसांत तिने एलिट मॉडेल्स इंडियाला तिचे फोटो पाठवले होते, ज्यात तिच्या कामाला खूप पसंती मिळाली. एलिटने डायनाला मॉडेलिंग असाईनमेंट करण्यास सांगितले. महाविद्यालयीन काळात डायना मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याविषयी खूप कन्फ्यूज होती, म्हणून तिने पार्टटाईम मॉडेलिंग केली.

2005 मध्ये डायनाने एलिट मॉडेल्स इंडियासाठी काम करण्यास सुरवात केली. कमी काळात डायनाने मॉडेलिंगच्या जगात आपली ओळख निर्माण केली. एवढेच नव्हे तर डायनाने एका मेबलीन जाहिरातीसाठी दीपिका पादुकोणला रिप्लेस केले होते.

तिच्या चित्रपटांविषयी बोलायचे म्हणले तर डायना पेंटीचा ‘कॉकटेल’ हिट झाल्यावर ती 4 वर्षानंतर ‘हॅपी भाग जायगी’ याचित्रपटात दिसली होती. या विनोदी चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय डायना ‘लखनऊ सेंट्रल’, ‘अणु: द स्टोरी ऑफ पोखरण’, ‘हॅपी फिर भाग जायेगी’ आणि ‘खाददानी शफाखाना’ मध्ये दिसली आहे.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार