Bigg Boss वर संतापली ‘ही’ अभिनेत्री म्हणाली – ‘TRP साठी स्पर्धकांच्या भावनांशी खेळताय !’

पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉस (Bigg Boss) हा शो अनेकदा वादात सापडला आहे. वादग्रस्त शो म्हणूनही हा शो ओळखला जातो. अनेकांना हा शो आवडतो तर अनेकांनी यावर टीकाही केली आहे. काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या लव्हर्स आणि हेटर्स यांच्यात वाद सुरू होता. अलीकडेच घरात इम्युनिटी टास्क घेण्यात आलं होतं. या टास्कवर अ‍ॅक्ट्रेस आणि एक्स बिग बॉस स्पर्धक डायंड्रा सॉरेस (Diandra Soares) हिनं संताप व्यक्त केला आहे. तिनं निमार्त्यांवर निशाणा साधला आहे.

बिग बॉसच्या घरात अलीकडेच इम्युनिटी टास्क झालं. यात स्पर्धकांनी असे अनुभव सांगितले जे अद्याप त्यांनी कुटुंबीयांना सांगितले नव्हते. हे सांगताना काहींना रडूही आलं होतं.

यावर आता बिग बॉसची एक्स स्पर्धक डायंड्रा सॉरेस हिनं संताप व्यक्त केला आहे. टीआरपीसाठी निर्माते स्पर्धकांच्या भावनांशी खेळत आहेत का, असा सवाल तिनं केला आहे.

डियांड्रा म्हणाली, हा अत्यंत भयानक टास्क आहे. अशा प्रकारचे टास्क खेळून स्पर्धकांच्या भावनांशी खेळणं योग्य नाही. निर्माते स्पर्धकांप्रति किती असंवेदनशील आहेत हे त्याचं प्रतीक आहे, असं म्हणत तिनं या टास्कबद्दल संताप व्यक्त केला आहे.

You might also like