FD वर मिळणार मोफत विमा ! बँक बुडाली तरी ठेवीदारांचे पैसे राहणार सुरक्षित, जाणून घ्या गणित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एखादी बँक ज्यावेळी बुडते तेव्हा ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी एक उपाय म्हणजे विमा संरक्षण वाढवणे होय. तर एकाच बँकेत आणि एकाच शाखेत या विम्याची मर्यादा ६५ लाखांपर्यंत वाढवता येणं असणार आहे. ते म्हणजे डीआयसीजीसी म्हणजेच ठेव विमा आणि पत हमी कॉर्पोरेशन (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) ने दिलेला विमा संरक्षण असतो. ४ फेब्रुवारी २०२० पासून डीआयसीजीसीद्वारे (DICGC) देण्यात येणारे विमा संरक्षण १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्यात आले आहे. परंतु अनेक ठेवीदारांसाठी ५ लाखांचं विमा संरक्षणदेखील कमी असू शकणार आहे.
अशा खात्यांवर मिळणार विमा –
बचत खाते (Savings account), मुदत ठेवी (Term deposits), चालू खाते (Current account), रिकरिंग डीपॉझिट (RD) अशा बँक खात्यांवर विमा सुरक्षा मिळतो. मात्र परदेशी सरकार, केंद्र किंवा राज्य सरकारच्या ठेवी, राज्य सहकारी बँक, राज्य भू-विकास बँक, आंतर बँक ठेवी यांना हे विमा संरक्षण मिळत नाही.
विमा संरक्षणाचे कार्य –
DICGC च्या मार्गदर्शक सूचनांनुसार, एखाद्या बँकेचा परवाना रद्द झाला, आणि त्याची पुनर्रचना झाली तर ज्या तारखेला हे परिवर्तन अस्तित्वात आले. त्या दिवशीच बँकेतील प्रत्येक ठेवीदाराची मूळ ठेव रक्कम आणि त्यावरील मिळणारे व्याज या रकमेसाठी ५ लाखांपर्यन्त विमा उतरविला जातो. म्हणजेच की एखाद्या बँकेमध्ये खातेदाराची कितीही खाती आणि त्यात कितीही रक्कम असली तरी त्या सर्व रकमेवर फक्त ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. या रकमेत मुद्दल आणि व्याज दोन्हीचा समावेश आहे. कोणत्याही उपाययोजनांनी बँक वाचली नाही आणि त्या बँकेची दिवाळखोरी जारी करण्यात आली. तसेच खातेदाराची मूळ मुद्दल ५ लाख रुपये असेल तर ते मिळेल परंतु त्यावर व्याज मिळू शकणार नाही.
वेगवेगळ्या खात्यांद्वारे अतिरिक्त विमा संरक्षण –
DICGC च्या नियमानुसार खातेदार एकाच बँकेत वेगवेगळ्या हक्कांनुसार आणि क्षमतेनुसार ठेवी ठेवल्यास खातेदाराच्या प्रत्येक ठेव रकमेवर ५ लाखांचे संरक्षण मिळेल. यासंदर्भात माहिती देताना सेबी (SEBI) नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आणि वित्तीय नियोजन फर्म हम फौजी इनिशिएटीव्हजचे CEO निवृत्त कर्नल संजीव गोविला यांनी सांगितले, ठेवीदार एकाच बँकेत वेगवेगळ्या हक्क आणि क्षमतांमध्ये मुदत ठेवी ठेवू शकतात. म्हणजेच तुम्ही तुमचा जोडीदार, भाऊ, मुले यांच्याबरोबर संयुक्त पद्धतीने (Joint Account) मुदत ठेवी ठेवल्यात तर सगळ्या ठेवी वेगवेगळ्या हक्क आणि क्षमतांमध्ये मोजल्या जातात. तर प्रत्येक खात्याला स्वतंत्रपणे ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच या पद्धतीनं ठेवीदार एकाच बँकेत आणि एकाच शाखेत वेगवेगळ्या ठेवींना विमा संरक्षण मिळवू शकतो.