पुन्हा भडकला कोरियाचा ‘तानाशाह’, कीम जोंगनं मंत्रालयातील 5 अधिकाऱ्यांना घातल्या गोळ्या

सियोल : वृत्तसंस्था –  उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन किती निर्दयी आहे याचा जगाला परिचय आहेच. आता पुन्हा यावर शिक्कामोर्तब झाले असून अर्थव्यवस्थेवर सवाल उपस्थित केल्याने हुकूमसाहा किम चिडला आणि त्याने पाच अधिकाऱ्यांना मृत्युदंड देण्याचा आदेश दिला. अधिकाऱ्यांवर गोळ्या घालण्याचे आदेश त्याने दिले. दरम्यान, किम जोंग याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनमधून नॉर्थ कोरियात येणाऱ्यांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.

कोरोना संकटकाळात जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्था संकटात सापडला आहेत. विकसित देश अशी टिमकी वाजवणाऱ्या देशांचा जीडीपी उणे झाला आहे. त्यात आधीच अमेरिकेसह जगभरातील देशांचे निर्बंध झेलत असणाऱ्या उत्तर कोरियाची अर्थव्यवस्था कोरोनामुळे रसातळाला गेली आहे. याबाबत रात्रीच्या जेवणाच्या कार्यक्रमात पाच अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्थेबाबत चर्चा केली. तसेच यावेळी त्यांनी किम जोंग उन शान काळाची निंदा केली. उत्तर कोरियाने आपल्यावरील निर्बंध हटवण्यासाठी इतर देशांची मदत घ्यावी असे मत अधिकाऱ्यांनी मांडले.

रात्रीच्या जेवणाच्या टेबलावर झालेली ही चर्चा किम जोंग उन याच्या कानावर आली असता त्याने सर्व अधिकाऱ्यांना बोलावून घेतले. त्यांची खरडपट्टी काढत त्याने त्यांच्याकडून कबूल करुन घेतले की, आमच्याकडून उत्तर कोरियाचे शासन कमकुवत करण्याचा गुन्हा झाला आहे. अधिकाऱ्यांनी कबूल करताच हुकुमशहा संतापला आणि त्याने त्यांना मृत्युदंड देण्याची शिक्षा फर्मावली. 30 तारखेला या सर्वांना रांगेत उभे करुन गोळ्या घालण्यात आल्या. तसेच अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना येडोक येथील एका राजकीय कॅम्पमध्ये पाठवून दिले.