आदि मानव देखील करत होते कंडोमचा वापर ? प्राण्यांच्या कातड्यापासून बनवली जात होती कंडोमसारखी गोष्ट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एचआयव्ही एड्स आणि नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम ही सर्वात यशस्वी गोष्ट आहे. जुन्या काळाच्या तुलनेत सध्याच्या काळात कंडोमचा वापर अनेक पटींनी वाढला आहे. यासह हे देखील स्पष्ट आहे की, आजच्या काळात लोक त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले आहेत, म्हणूनच ते कंडोम वापरत आहेत.पण कंडोमचा वापर केव्हापासून होत आहे, याबद्दल फारशी माहिती नसेल. दरम्यान, कंडोमच्या इतिहासाबद्दल सांगितले जाते कि, याला सर्वात आधी 16 व्या शतकात प्राण्यांच्या आतड्यांपासून बनविले जाते. या कारणास्तव, त्यावेळी कंडोमची किंमत खूप जास्त होती.

कंडोमच्या इतिहासासंदर्भात दोन प्रकारच्या बाजू समोर आहेत. पहिली बाजू मांडणाऱ्या इतिहासकारांचा दावा आहे की, कंडोमचे नाव ‘डॉक्टर कंडोम’ नावावरून पडले. डॉक्टर कंडोमने 16 व्या शतकात किंग चार्ल्स ला मेंढीच्या लेदरपासून बनविलेले कंडोम दिले होते. तर इतिहासकारांची दुसरी बाजू यास पूर्णपणे सहमत नाही. कंडोमच्या इतिहासाबाबत, एका अहवालात सांगितले गेले की, फ्रान्समधील एका गुहेत सुमारे 12000-15000 वर्ष जुनी चित्रकला सापडली होती. त्या चित्रात कंडोमसारखे दिसणारे चित्रही बनवले गेले होते. दरम्यान, याची पुष्टी झालेली नाही की, त्या वेळी नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही हेतूसाठी कंडोम वापरला गेला होता. कंडोमचा खरा इतिहास काय आहे याबद्दल वेगवेगळे इतिहासकारांचे मत भिन्न आहे. पण हे स्पष्ट आहे की, 17 व्या शतकात कंडोमचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात झाली होती.

मीडिया रिपोर्टनुसार ब्रिटनमधील डूडली कॅसल येथे उत्खनन चालू असताना मध्ययुगीन टॉयलेटमधून काही कंडोम सापडले होते. उत्खननात सापडलेले कंडोम जनावरांच्या आतड्यांमधून बनविलेले होते. अहवालात म्हटले आहे की, प्राण्यांच्या आतड्यांमधून बनविलेले कंडोम 1646 च्या आसपास वापरले गेले होते. दरम्यान, रबरपासून बनवलेल्या कंडोमचा शोध चार्ल्स गुडियार यांनी 1839 मध्ये लावला होता. रबर कंडोमच्या शोधानंतर त्यांनी 1844 मध्ये पेटंट देखील केले. काही वर्षानंतर बर्‍याच कंपन्यांनी रबर कंडोम तयार करण्यास सुरवात केली.