‘शत्रू’चं विमान समजून इराणनं 176 प्रवाशांचा ‘जीव’ घेतला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी सकाळी तेहरान विमानतळावर यूक्रेनच्या एका विमानाचा अपघात झाला. या अपघातात सर्व 176 प्रवाशांच्या मृत्यू झाला. इराणकडून सांगण्यात आले की तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण करताच या विमानाचा अपघात झाला. परंतु या अपघातावर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत. एका वृत्तानुसार दावा करण्यात येत आहे की इराणने चुकून या विमानावर मिसाइल हल्ला केला. परंतु इराणकडून याला नकार देण्यात आला. परंतु अपघाताचे कारण कोणाला पटेनासे आहे.

अपघातावेळी काय झाले 
बोइंग 737-800 विमानाने तेहरान विमानतळावरुन सकाळी 6 वाजून 13 मिनिटांनी उड्डाण केले, परंतु 2 – 3 मिनिटात या विमानाचा अपघात झाला. इराणच्या एका वृत्ताकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. यात दिसते की अपघातावेळी आगीचे गोळे खालून वर जात होते. ही घटना अमेरिकेच्या हवाई तळांवर करण्यात आलेल्या मिसाइल हल्ल्यानंतर घडली. त्यामुळे या अपघातावर शंका उपस्थित होत आहेत.

विमानावर हल्ला झाला 
अपघाताचे कारण अजून तरी स्पष्ट झाले नाही. परंतु एक विमान तज्ज्ञाने दावा केला की विमानावर हल्ला झाला. त्यांचे म्हणणे आहे जेव्हा तपासाचे काम सुरु होईल तेव्हा या हल्ल्याचा या बाजूने देखील तपास करावा. हल्याच्या तात्काळ काही वेळाने दोन्ही देशांकडून वेगवेगळी विधाने आली. इराणचे एक मंत्री कासिम बिनियाज म्हणाले की इंजिनमध्ये आग लागली आणि वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले. तर तेहरानमध्ये यूक्रेनच्या दुतावासाकडून दहशतवादी हल्ल्याला नकार नंतर त्यांनी सांगितले की आता यावर बोलणे अवघड आहे की अपघात कसा झाला.

बॅल्क बॉक्स देण्यास नकार 
बॅल्क बॉक्समुळे अपघाताचे कारण स्पष्ट होऊ शकते. परंतु इराणकडून सध्या ब्लॅक बॉक्स देण्यास नकार दिला आहे. इराणने सांगितले की ते अमेरिकेच्या कंपनीला ब्लॅक बॉक्स देण्यात येणार नाही. त्यामुळे इराणवर शंका उपस्थित केली जात आहे.

अनुभवी वैमानिक
अपघाती विमान अत्यंत सुरक्षित स्थितीत असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षेच्या बाबतीत विमानचे रेकॉर्ड चांगले होते. हे विमान 2016 सालीच्या बनावटीचे होते. सोमवारी विमानाची फिट असल्याची चाचणी देखील झाली होती. या दरम्यान युक्रेन एअरलाइनने दावा केला की कोणत्याही चूकीमुळे अपघात झालेला नाही. विमानाच्या दोन्ही वैमानिकांना 11 हजार तास विमान उडवण्याचा अनुभव होता. त्यामुळे या अपघातावर शंका उपस्थित केली जात आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/