वेगळे विदर्भ राज्य देता कि सत्तेतून जाता ; आंदोलकांचा सरकारला सवाल 

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – विर्दभाला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी अनेक  वर्षे केली जाते आहे. याच मागणीला लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने बहर चढू लागला आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीची वेगळ्या विदर्भाची मागणी अनेक  वर्षांपासूनची आहे. सरकारच्या वतीने अनेक आश्वासने देऊन हि आम्हाला वेगळे राज्य दिले जात नाही.  एवढे असून हि आम्ही हिंमत हरणार नाही. आता आम्हाला वेगळे राज्य देता कि जाता असा सवाल आम्ही भाजप सरकारला करणार आहे असे  विदर्भ राज्य समितीचे नेते वामनराव चटप यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हणले आहे.

विदर्भ राज्य आंदोलन समितीने अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केले आहे. परंतु अनेक सरकारे आले आणि गेली परंतु आमच्या मागणी कडे कोणी लक्ष दिले नाही म्हणून आम्ही आता आंदोलनाचा तीव्र पवित्र घेणार आहे. वेगळा विदर्भ देण्यासाठी सरकारला धारेवर धरण्यासाठी २ जानेवारी पासून आम्ही विदर्भ राज्य निर्माण यात्रेला आरंभ केला आहे. सदरची यात्रा गुरुवारी अमरावती येथे पोचली असता  समितीचे नेते वामनराव चटप यांनी पत्रकार परिषद घेवून भाजप सरकारला धारेवर धरले आहे. १२ जानेवारी पर्यंत विदर्भात फिरून नागपूरला जाणार असून नागपूर या ठिकाणी भाजपच्या सरकारला आठ प्रश्न विचारले जाणार असून त्या प्रश्नांची उत्तरे भाजप सरकार कडून घेतली जाणार आहेत.

वेगळ्या विर्दभाची निर्मिती कधी केली जाणार, उत्पादनावर आधारित शेतमालाला दर कधी दिला जाणार, वैदर्भीय जनतेला वीज निम्म्या दराने कधी देणार, शेतकऱ्यांची कर्जे कधी माफ करणार, शेती पंपांच्या विजेचे बिल कधी माफ करणार, दोन कोटी युवकांना दर वर्षी रोजगार कधी देणार या मागणायसाठी हि यात्रा काढण्यात अली आहे. या पत्रकार परिषदेला सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीणकुमार चक्रवर्ती, श्रीकांत तराळ, रंजना मामर्डे, रियाज अहमद खान, अलीम पटेल, घनश्याम पुरोहित, नंदू खेरडे, राजाभाऊ आगरकर, विजय मोहोड, सुषमा मुळे, सतीश प्रेमलवार, कृष्णराव पाटील, विनोद इंगोले, विजय कुबडे, नितेश ताजने, किरण गुडधे, सुयोग माथुरकर, सुबोध इंगळे, नजीबउल हसन, मनीषा इंगळे, राजेंद्र राऊत इत्यादी प्रमुख मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.