मुंबई विद्यापीठ काँग्रेसचे ‘बटीक’ बनले काय ? : भाजपचा सवाल

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने उभ्या राहिलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये विद्यापीठ कायदा विषयावरचे प्रशिक्षण दि. ३१ जानेवारी आणि दि. १ फेबुवारी असे दोन दिवस आयोजित केले होते. एक दिवस प्रशिक्षण झाले आणि तातडीने ते रद्द करण्यात आले. काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतल्याने प्रशिक्षण रद्द केल्याचा आरोप भाजपचे आमदार आशीष शेलार आणि अतुल भातखळकर यांनी केला आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1223842356698456064?s=08

युवक काँग्रेसने दबाव आणल्याने योगेश सोमण यांना रजेवर पाठविण्यात आले, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरु असलेला प्रशिक्षण कार्यक्रम अर्ध्यावर बंद केला हा वैचारिक मुस्कटदाबीचा प्रकार आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे. प्रशिक्षण रद्द झाल्याने प्रबोधिनीचे कोणतेही नुकसान होणार नाही पण काँग्रेसची वैचारिक दिवाळखोरी आणि सरकारची वैचारिक अस्पृश्यता यातून दिसली त्याचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया आ. शेलार यांनी व्यक्त केली असून निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.