मोबाईलवर गेम खेळू दिला नाही ; १३ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मोबाईलवर गेम खेळ्यास नकार दिल्याने पुण्यातील एका १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकरा समोर आला आहे. ही घटना ३१ डिसेंबर २०१८ रोजी घडली आहे. सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने आपल्या राहत्या घरामध्ये बेल्टने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिवाराला मोठा मानसिक धक्का बसला आहे. हा प्रकार सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.

सहकारनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मनीष भुतडा (वय-१३) या मुलाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी मुलाच्या घरच्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेच्या दिवशी गणेश मोबाईलवर गेम खेळत होता. गणेशच्या आईने त्याला अभ्यास करण्यास सांगितले. मात्र गणेश आईचे म्हणणे न ऐकता मोबाईलमध्ये गेम खेळत होता. या वरुन गणेशची आई त्याला रागवत होती. त्याला समजावून देखील सांगत होती. मात्र, त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसनच लागले होते. हातात मोबाईल येताच तो गेम खेळण्यास सुरुवात करत होता. त्यामुळे त्याच्या अभ्यासवर परिणाम होत होता. घटनेच्या दिवशी गणेशच्या आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊन अभ्यास करण्यास सांगितले.

मोबाईलवर गेम खेळत असताना आईने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याने गणेश निराश झाला होता. त्याने गेम खेळण्याचा हट्ट आईकडे करत होता. मात्र, आईने गेम खेळण्यास मोबाईल दिला नाही. याचा राग आल्याने तो आपल्या खोली मध्ये जाऊन दरवाजा आतून बंद केला. बराचवेळ झाला तरी गणेशने दरवाजा उघडला नसल्याने आणि जेवणासाठी बराचवेळ दरवाजावर वाजवून देखील त्याने दरवाजा उघडला नाही. याची माहिती आईने गणेशच्या पतीला फोन करुन दिली. वडीलांनी तत्काळ घरी येऊन दरवाजा वाजवला. गणेशने दरवाजा उघडला नसल्याने खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी गणेशने बेल्टच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

You might also like