बिग बॉस 14 साठी पूनम पांडेनं पतीसोबत केलं भांडण ? स्वतःच सांगितलं ‘सत्य’

मुंबई : मागील काही दिवसांपासून अभिनेत्री पूनम पांडे चर्चेत राहिली आहे. प्रथम पूनमने तिच्या प्रियकराशी छुप्या पद्धतीने लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर लग्नाच्या 12 दिवसानंतर, मारहाण आणि गुंडगिरीच्या आरोपाखाली पतीला जेलमध्ये पाठवलं. आता पुन्हा दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

पूनम पांडे बिग बॉस 14 मध्ये येणार?

दरम्यान, बिग बॉस 14 चा भाग होण्यासाठी तिने हे सर्व नाटक केले असल्याची चर्चा आहे. यावर आता पूनम पांडेनं प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ई-टाईम्सशी संवाद साधताना पूनम पांडे म्हणाली- अजिबात नाही, मी बिग बॉस 14 मध्ये जात नाही. या शोसाठी मी खूप लहान आहे. ती सलमान खानच्या या शोचा एक भाग असल्याचे पूनमने स्पष्टपणे नाकारले. यापूर्वी पूनम पांडे बिग बॉसचा भाग झाल्याच्या बर्‍याच बातम्या आल्या आहेत. पण पूनमने हे नेहमीच नाकारले आहे.

पूनम पांडेनं सांगितलं की, आता तिचा आणि सॅम बॉम्बे मधील वाद संपला आहे. ते सध्या गोव्यात हनीमूनसाठी गेले आहेत आणि लवकरच मुंबईला परतणार आहेत. 10 सप्टेंबर रोजी दोघांचे लग्न झाले होते. पूनमने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गेल्या 2 वर्षांपासून ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत होते.

पूनमबद्दल बोलायचे झाले, तर ती तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. तिच्या इंस्टा प्रोफाइलमधून समजते की पूनम किती बोल्ड आहे. पूनमने बॉलिवूड सिनेमांमध्येही काम केले, पण तिला यश मिळालं नाही. पूनम फक्त तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहिली आहे.