यांनी काय ‘श्रावणबाळ’ जन्माला घातला का ? राणे बंधुंचा CM ठाकरेंवर तीव्र संताप

मुंबई : पोलीसनामा ऑनालाईन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं थेट आव्हानही त्यांनी दिलं. इतकंच नाही तर त्यांनी भाजप नेते आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) व त्यांच्या दोन्ही सुपुत्रांवर अप्रत्यक्ष टीका केली. नाव न घेता ठाकरेंनी राणेंना बेडकाची उपमा दिली. त्यानंतर आता राणे बंधुंनी शिवसेनेवर टीका केली आहे.

नितेश राणे (Nitesh Narayan Rane) यांनी ट्विट करत त्यांचं म्हणणं मांडलं आहे. त्यांनी लिहिलं की, “बिहारच्या अगोदरच पक्षप्रमुखांनी लस घेतलेली दिसते. जास्त हवा भरलेली आज. किती आव. टाचणी तयार आहे. योग्य वेळ येऊ द्या. दुसऱ्यांची पिल्लं वाईट मग यांनी काय त्या DINO च्या खुशीत नशा करून मुलींवर अत्याचार करणाार श्रावणबाळ जन्माला घातला आहे का ? इतकी खुम खुमी आहे ना मग ती दिशा सालियान (Disha Salian)ची केस मुंबई पोलिसांवर कुठलाही दबाव न टाकता निपक्षपाती चौकशी करू द्या. मग कळेल श्रावणबाळ काय दिवे लावतो ते.”

निलेश राणे यांनी (Nilesh Narayan Rane)ट्विट केलं आहे की, नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फालतू आणि पोकळ भाषण केलं. मराठा व धनगर आरक्षणाबद्दल एक वाक्य पण बिहारवर 20 मिनिटे. उद्धव ठाकरे धमकी कुणाला देता. आम्ही चॅलेंज देतो की, एका दिवसासाठी विसरा तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि होऊन जाऊ दे एकदा… तुमच्या धमक्यांना आम्ही फाट्यावर मारतो असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

“बेडकं कितीही फुगले तरीही ते वाघ होत नाहीत. तुम्हाला माहित आहे का एक बेडूक आणि त्याची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतात. आपण गोष्टीत बेडकानं बैल पाहिला हे ऐकलं असेल परंतु या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्लं आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकानं ओरडायचा प्रयत्न केला. पंरतु त्याचा आवाज आता चिरका झालाय.”

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like