‘या’ अभिनेत्रीनं 14 वर्षांपू्र्वी ‘खिलाडी’ अक्षयसोबत केला होता डेब्यू, आता दिसते ‘अशी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री नीतू चंद्राने 2005 साली बॉलिवूड स्टार अक्षय कुमारसोबत बॉलिवूड डेब्यू केला होता. परंतु नीतू आज इंडस्ट्रीपासून दूर आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी एक सिनेमा केला आणि नंतर त्या गायब झाल्या. अशीच एक अभिनेत्री आहे नीतू चंद्रा.

2005 साली अक्षयचा गरम मसाला हा सिनेमा आला होता. या सिनेमात नीतूने अक्षयच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती. स्वीटी असं तिच्या भूमिकेचं नाव होतं. या सिनेमाने तिला खूपच लोकप्रियता मिळाली होती. यानंतर तिला अनेक सिनेमे मिळाले. ट्राफिक सिग्नल, समर 2007, वन टू थ्री, ओए लकी लकी ओए अशा अनेक सिनेमात ती दिसली.

नीतू बॉलिवूडमध्येच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि भोजपुरी अशा अनेक सिनेमात तिने काम केलं आहे. कुछ लव जैसा या सिनेमात ती शेवटची दिसली. 2011 साली हा सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर मात्र ती बॉलिवूडमधून गायबच झाली. नीतू एक फिटनेस फ्रीक आहे.

भोजपुरी मातृभाषा असणारी नीतू बिहारच्या आरामधली आहे. पाटण्यात तिनं आपलं शिक्षण घेतलं आहे. नंतर तिने दिल्लीला आपंल पुढचं शिक्षण घेतलं. नीतू आधी मॉडेलिंग करत होती. नंतर ती सिनेमात आली. सध्या ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

visit : policenama.com