PF वर मिळतो तब्बल 6 लाखांचा ‘विनामूल्य’ विमा, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भविष्य निर्वाह निधीमध्ये जर तुमचं खातं असेल आणि तुमचा भविष्य निर्वाह निधी जमा होत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या नावावर पीएफ जमा होत असेल तर तुम्हाला विनामूल्य 6 लाखांचा विमा मिळू शकतो. EDLI या योजनेअंतर्गत या सुविधेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही अतिरीक्त शुल्क भरावे लागणार नाही.

EDLI या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या या सुविधेत कर्मचारी किमान 2.5 लाख आणि जास्तीत जास्त 6 लाखांपर्यंत विमा संरक्षण घेऊ शकतात. मुख्य म्हणजे जर त्या कर्माचाऱ्याचा अपघआती मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील सदस्यांना या रकमेसाठी दावाही करता येतो.

कंपनी जमा करते एवढे पैसे
या योजनेत विमा संरक्षणासाठी कंपनी कर्मचाऱ्याच्या वतीने हप्ता भरते त्यामुळे कर्माचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अतिरीक्त शुल्क भरावे लागत नाही. हप्त्याची रक्कम कर्मचाऱ्याच्या मूलभूत पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या 0.50 टक्के असते. मूलभूत वेतन हे जास्तीत जास्त 15 हजारांपर्यंत मोजले जाते.

कर्मचाऱ्यांना कोणत्या गरजेसाठी पीएममधून किती रक्कम काढता येते ?
सरकराने नुकतेच भविष्य निर्वाह निधीत काही बदल केले आहेत. जर कर्मचाऱ्याला त्याच्या पीएफ फंडातून पैसे काढायचे असतील तर त्या व्यक्तीस ऑनलाईन क्लेम करावा लागतो. जाणून घेऊयात कोणत्या गरजेसाठी कर्मचारी किती रक्कम काढू शकतात.

पीए खात्यातून काढली जाणारी रक्कम काढू शकता की नाही हे खात्याच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुम्हाला तुमच्या मुलाच्या, भावंडाच्या, किंवा स्वत:च्या लग्नासाठी पैसे काढायचे असतील तर तुम्ही पीएफ खात्यातून 50 टक्के रक्कम व्याजासहित काढू शकता. याव्यतिरीक्त तुम्ही पत्नी किंवा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी पीएफ खात्यातील 50 टक्के रक्कम व्याजासहित काढू शकतात. यासाठी एक अट आहे ती म्हणजे कर्मचाऱ्याने नोकरीत 7 वर्षे पूर्ण केलेली असावीत.

जर तुम्हाला घर खरेदी करायचे असेल किंवा घर बांधायचे असेल तर तुम्ही मासिक पगाराच्या 36 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकता. याशिवाय जर तुम्हाला जमीन खरेदी करायची असेल तर मासिक पगाराच्या 24 टक्के रक्कम तुम्ही काढू शकता.

पीएफ रक्कम काढण्यची प्रकिया कशी आहे ?
सर्वात आधी तुम्ही EPFOची वेबसाईट unifiedportal-mem.epfindia.gov.in वर जा. यानंततर तुम्ही UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. यानंतर तुम्हाला Manage या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. नंतर तुम्ही KYC तपासून पहा. तुम्हाला आता Online Services हा पर्याय निवडायचा आहे आणि CLAIM (FORM-31, 19&10C)वर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला अनेक पर्याय मिळतात जसे की, EPFचै पैसे काढणे, लोन आणि अ‍ॅडव्हान्ससाठी पैसे काढणे इत्यादी. तुम्ही ज्या कारणासाठी पैसे काढत आहात त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

योग्य पर्याय निवडल्यानंतर तुम्ही आवश्यकता आणि नियमानुसार अर्ज भरा. अर्ज दाखल केल्यानंतर 10 दिवसात पीएफ खात्याशी जोडलेल्या आपल्या नोंदणीकृत बँक खात्यात तुमची रक्कम जमा होईल.

Visit : policenama.com