Coronavirus : जगभरात ‘कोरोना’चा हाहाकार ! ‘हे’ 12 देश अद्यापही ‘व्हायरस’पासून दूर, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – संपूर्ण जगातील देश काही आठवड्यापासून कोरोना व्हायरसमुळे चिंतेत आहेत. परंतु असे काही देश आहेत जे कोरोना व्हायरसपासून अद्यापही दूर आहेत म्हणजेच या देशांना कोरोनाचा अद्याप स्पर्श देखील झालेला नाही. असे 12 देश आहेत जेथे 31 मार्चपर्यंत कोरोनाचा अद्यात एक ही रुग्ण आढळला नाही. यात आफ्रिकेतील 7 देशांचा आणि 5 अशियायी देशांचा समावेश आहे. असे काही पॉसिफिक बेट देखील आहेत जे कोरोनापासून दूर आहेत.

एकीकडे, युरोपातील एक ही असा देश उरलेला नाही जो कोरोनाने प्रभावित नाही. साऊथ अमेरिका, उत्तर अमेरिकेत देखील नोवेल कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. ज्या आफ्रिकेतील देशांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही त्या देशात साऊथ सुदान, कोमोरोस, मालवी, बोस्टवाना, बुरांडी, सैंरा लिओन आणि सोओ टोम आणि प्रिन्सेपे या देशांचा समावेश आहे.

उत्तर कोरिया, म्यानमार, तझाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि येमन या अशियायी देशात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही.

मंगळवारी जगभरात कोरोनाचे 7.86 लाख पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील जवळपास 37,820 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनमध्ये कोरोना फोफावला आहे. चीन या देशातून पसरलेला हा व्हायरस आता चीनमध्ये नियंत्रणात आला आहे.

भारतात आतापर्यंत 1,251 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. तर देशात कोरोनामुळे आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत 101 रुग्णांवर उपचार करुन त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे