‘दीदीगिरी’ चालणार नाही, ‘या’ अभिनेत्याचा ममता बॅनर्जींना इशारा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – कोलकात्यात मंगळवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीदरम्यान, भाजप आणि तृणमूलचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते आणि यातून तुफान राडा झाला होता. याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहे. लोकसभा निवडणुकीचा अजून शेवटचा टप्पा बाकी आहे. त्याअगोदरच या प्रकरणाने भाजप सरकारच्या भूमिकेविषयी शंका घेण्यास सुरुवात झाली आहे.

या वादात आता अभिनेता ‘विवेक ओबेराय’ याने देखील उडी मारली आहे. दीदीगिरी नही चलेगी’, असं म्हणत ममता बॅनर्जी यांच्यावर त्याने निशाणा साधला आहे. लोकशाही धोक्यात आहे, विरोधी पक्षांनी एकत्र येत काम करण्याची गरज असल्याच्या बॅनर्जी यांच्या वक्तव्याला अधोरेखित करत त्याने ट्विट करत म्हटले आहे कि, ममता बॅनर्जी यांच्यासारख्या जबाबदार आणि आदरणीय महिला सद्दाम हुसेन यांच्यासारखी का वागत आहे ?

त्यांच्या या हुकूमशाहीमुळे इथे लोकशाही धोक्यात आहे. दरम्यान, प्रियांका शर्मा आणि तेजिंदर बग्गा यांना यामुळे सहन कराव्या लागलेल्या अडचणीचा देखील त्याने या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे. देशभरात या प्रकारच्या घडलेल्या हिंसा आणि एकूणच दूषित प्रचाराच्या वातावरणामुळे साऱ्या देशवासीयांची लक्ष २३ मे कडे लागले आहे. या दिवशी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like