‘शौचालय’ साफ करण्यासाठी खासदार बनले नाही ; खा. साध्वी प्रज्ञा यांचं ‘बेलगाम’ वक्तव्य (व्हिडिओ)

सीहोर : वृत्तसंस्था – आपल्या बेताल वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या आणि मालेगाव बॉम्ब स्फोटातील आरोपी भाजपा खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आणखी एक बेताल वक्तव्य केले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात राबवत असलेल्या स्वच्छता अभियानाची अप्रत्यरित्या खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी मी खासदार बनले नाही, असे बेलगाम वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले आहे. सोहोर येथे झालेल्या एका कार्यक्रमात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून त्या ट्रोल होत आहेत.

लक्षात ठेवा, आम्ही नाले स्वच्छ करण्यासाठी खासदार झालेलो नाहीत. आम्ही शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही. ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती काम आम्ही प्रामाणीकपणे करु, असे साध्वी बोलाता व्हिडीओमध्ये दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे बद्दल वक्तव्य केले होते. तसेच शहीद हेमंत करकरे यांच्या विरोधातही बेताल वक्तव्य केले होते. सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.

आरोग्यविषय वृत्त –