कार अपघातात सेवा निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू 

परभणी- पोलीसनामा ऑनलाईन : भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने कारला धडक मारली असता मोठा अपघात घडून आला आहे. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. परभणी – वसमत रस्त्यावर हा अपघात झाला आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास परभणीहून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रकने नांदेडहून परभणीकडे येणाऱ्या कारला (शहर परिसरातील) चौपाल सागर परिसरात जोराची घडक दिली. या अपघातात परभणी येथील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी फसीयोद्दीन शेख व नरहरी कदम या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (घटनास्थळी) परभणीकडून  वसमतकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरणाचे सध्या काम सुरू आहे.

निवृत्त पोलीस अधिकारी फसीयोद्दीन शेख हे सेवानिवृत्तीनंतर राजकारणात मोट्या प्रमाणात सक्रीय होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते.

परभणीपासून अवघ्य 2 कि.मी. अंतरावर चौपाल सागर हा मॉल आहे. या मॉलसमोरच ही घटना घडली आहे . घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला, असून  भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने कारला धडक दिली. जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.  चौपाल सागर परिसरात अपघाताची चार दिवसांतली ही दुसरी घटना आहे.